Close Menu
लोकशाहीलोकशाही
    Facebook X (Twitter) Instagram
    Trending
    • एमपीएससी परीक्षेबाबत दुसरे जंतर-मंतर आंदोलन करणार!
    • मुख्यमंत्री विजय यांच्या नावाने बनावट सोशल मीडिया अकाउंट
    • परिश्रमानेच यशाची प्राप्ती : स्वामी जनार्दन हरीजी महाराज
    • ब्रिक्स : सांस्कृतिक संवादातून जागतिक एकात्मतेच्या नव्या पाऊलखुणा
    • पाळधी बायपासवर कंटेनर उलटून दोनगावच्या तरुणाचा मृत्यू
    • आत्मसमर्पण टाळण्यासाठी ५ कोटी रुपये जमा करा!
    • विजय थलपती विरोधात विरोधक एकवटले
    • तुरुंगात गेल्यावर मला विपश्यनेलाच आल्यासारखं वाटलं
    Facebook X (Twitter) Instagram
    लोकशाहीलोकशाही
    Demo
    • होम
    • राष्ट्रीय
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
    • जळगाव
      • जळगाव जिल्हा
    • राजकारण
    • गुन्हे वार्ता
      • अपघात
    • संपादकीय
      • लोकशाही विशेष
    • व्हिडीओ
    • ई-पेपर
    • आणखी
      • हवामान
      • कृषी
      • नोकरी संदर्भ
      • आरोग्य
      • शैक्षणिक
      • खाद्य संस्कृती
      • राशी भविष्य
      • अध्यात्म
      • लोकार्थ
      • पॉडकास्ट
    लोकशाहीलोकशाही
    Home»महाराष्ट्र»दिशा सालियन मृत्यू प्रकरणी आदित्य ठाकरेंना क्लीन चीट
    महाराष्ट्र

    दिशा सालियन मृत्यू प्रकरणी आदित्य ठाकरेंना क्लीन चीट

    Team Lokshahi LiveBy Team Lokshahi LiveJuly 3, 2025No Comments0 Views
    Facebook Twitter Pinterest LinkedIn WhatsApp Reddit Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

     

    लोकशाही न्यूज नेटवर्क

    सेलिब्रिटी मॅनेजर दिशा सालियनची हत्या झाल्याचं किंवा तिच्यावर कोणत्याही प्रकारचा लैंगिक अत्याचार झाल्याचं वैद्यकीय आणि वैज्ञानिक पुराव्यांतून सिद्ध झालेलं नाही, अशी माहिती मुंबई पोलिसांनी बुधवारी उच्च न्यायालयात दिली. दिशा सालियनच्या वडिलांनी केलेल्या याचिकेत शिवसेना (ठाकरे) नेते आदित्य ठाकरे यांच्यावर आरोप करण्यात आला होता. या याचिकेवर पोलिसांनी हे प्रतिज्ञापत्र सादर केलं आहे. दिशाची हत्या झाल्याचा आणि त्यापूर्वी तिच्यावर सामूहिक बलात्कार झाल्याचा दावा करून प्रकरणाची सीबीआय चौकशी करण्याच्या मागणीसाठी तिचे वडील सतीश सालियन यांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती.

    न्यायमूर्ती अजय गडकरी आणि न्यायमूर्ती आरिफ डॉक्टर यांच्या खंडपीठापुढे ही याचिका बुधवारी सुनावणीसाठी आली. त्यावेळी मालवणी पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ निरीक्षकांनी या प्रकरणी प्रतिज्ञापत्र दाखल केलं. या प्रतिज्ञापत्रात सतीश यांनी केलेल्या दाव्यांचं खंडन केलं आहे. प्रतिज्ञापत्रात घटनेच्या दिवशी नेमकं काय घडलं हे नमूद केलं आहे. तसंच घटनेच्या वेळी दिशासह असलेला तिचा प्रियकर आणि मित्रांनी दिलेल्या जबाबात सत्य असल्याचं म्हटलं आहे.

    दरम्यान दिशा सालियन मृत्यूप्रकरणी निर्णय देण्याआधी आपली बाजू ऐकून घ्यावी, अशी मागणी आदित्य ठाकरे यांच्या वतीने बुधवारी उच्च न्यायालयात करण्यात आली. ठाकरे यांनी हस्तक्षेप याचिकेद्वारे ही मागणी केली. या प्रकरणी आपण प्रतिवादी नसलो तरीही आपलं नाव राजकीय सूडबुद्धीने गोवण्यात आलं आहे. आपल्याविरोधात द्वेषाने, वैयक्तिक आणि राजकीय सूड उगवण्यासाठी खोटी, निरर्थक याचिका केल्याचा दावाही ठाकरेंनी केला आहे.

    दिशाचे वडील सतीश सालियन यांनी त्यांच्या याचिकेत दावा केला की, 8 जून 2020 रोजी दिशाने तिच्या घरात एका पार्टीचं आयोजन केलं होतं. या पार्टीला आदित्य ठाकरे, त्यांचे बॉडीगार्ड, अभिनेता सूरज पांचोली आणि डिनो मोरिया यांच्यासह इतर कलाकार उपस्थित होते. दिशावर सामूहिक बलात्कार करण्यात आला, तिच्यावर लैगिक अत्याचार झाले, असा दावा या याचिकेत करण्यात आला होता. परंतु दिशाच्या वडिलांनी केलेले सामूहिक बलात्काराचे आरोप निराधार असल्याचं वरिष्ठ पोलीस निरीक्षक शैलेंद्र नगरकर यांनी सांगितलं.

    नगरकर यांनी स्पष्ट केलं की 2020 चा क्लोजर रिपोर्ट हा वैज्ञानिक तपासणी आणि बोरिवली पोस्टमॉर्टम सेंटरने जारी केलेल्या पोस्टमॉर्टम रिपोर्टवर आधारित होता, ज्यामध्ये लैंगिक अत्याचार किंवा शारीरिक हल्ल्याची कोणतीही लक्षणं आढळली नाहीत. घटनेच्या रात्रीचे सीसीटीव्ही फुटेज आणि मोबाइल कॉल रेकॉर्ड तपासण्यात आले. परंतु त्यातही कोणत्याही संशयास्पद किंवा आक्षेपार्ह गोष्टी आढळल्या नाहीत, असं पोलीस निरीक्षकांनी सांगितलं. पोस्टमॉर्टम आणि फॉरेन्सिक रिपोर्ट यांचा हवाला देऊन एसआयटीने न्यायालयाला सतीश सालियन यांची याचिका फेटाळण्याची विनंती केली आहे. परंतु पोलिसांचा हा तपास अपुरा होता, असं म्हणत वकील नीलेश ओझा यांनी याचिकेला आव्हान दिलं आहे. त्यामुळे न्यायालयाने पुढील युक्तिवादासाठी दोन आठवड्यांचा कालावधी दिला आहे.

    #maharashtra #politics aditya thackeray celebrity Clean Chit Death Disha Salian Justice Ajay Gadkari Justice Arif Doctor Malvani Police Station Sexual assault
    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Telegram Email
    Team Lokshahi Live
    • Website

    Related Posts

    मुख्यमंत्री विजय यांच्या नावाने बनावट सोशल मीडिया अकाउंट

    September 9, 2026

    परिश्रमानेच यशाची प्राप्ती : स्वामी जनार्दन हरीजी महाराज

    September 9, 2026

    पाळधी बायपासवर कंटेनर उलटून दोनगावच्या तरुणाचा मृत्यू

    September 9, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Lokshahi Live. Designed by ContentOcean Infotech.
    • Contact Us
    • About us

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

    whatsapp-Gif