जळगावात राजकीय तणाव !आदित्य ठाकरेंच्या स्वागताचे बॅनर फाडले

0

धरणगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क 

युवा सेनेचे प्रमुख आदित्य ठाकरे (Yuva Sena chief Aditya Thackeray) आज जळगाव (Jalgaon) जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. ते जिल्ह्यात 3 ठिकाणी मंत्री गुलाबराव पाटील (Minister Gulabrao Patil), आमदार किशोर पाटील (MLA Kishor Patil) व चिमणराव पाटील (MLA Chimanrao Patil) यांच्या मतदारसंघात जाहीर सभा घेणार आहेत. धरणगावमध्ये (Dharangaon) अज्ञात व्यक्तींनी त्यांच्या स्वागताचे बॅनर फाडल्याची घटना घडली आहे. बॅनर फाडल्याने मध्यरात्रीनंतर तणाव निर्माण झाला होता. पोलिसांनी परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन वेळीच धाव घेतली, त्यामुळे अनर्थ टळला.

युवा सेनेचे प्रमुख आदित्य ठाकरे आज जळगाव जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. ते जिल्ह्यात 3 ठिकाणी मंत्री गुलाबराव पाटील, आमदार किशोर पाटील व चिमणराव पाटील यांच्या मतदारसंघात जाहीर सभा घेणार आहेत. धरणगावमध्ये अज्ञात व्यक्तींनी त्यांच्या स्वागताचे बॅनर फाडल्याची घटना घडली आहे. बॅनर फाडल्याने मध्यरात्रीनंतर तणाव निर्माण झाला होता. पोलिसांनी परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन वेळीच धाव घेतली, त्यामुळे अनर्थ टळला.

युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांचा जळगाव जिल्हा “शिव संवाद” यात्रा दौरा आज दि.२० ऑगस्ट, शनिवारी दुपारी १ वाजता धरणगाव शहरात छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकाजवळ आयोजित केला आहे. यानिमित्ताने धरणगाव शहरात शिवसेना व युवासेनाकडून आदित्य ठाकरे यांचे स्वागत बॅनर जागोजागी लावल्याचे दिसून येत आहे. मात्र काही अज्ञातांकडून आज मध्यरात्री १२ वाजेदरम्यान शहरातील गणेश नगर, हेडगेवार नगर, व उड्डाण पुलाजवळ शिव संवाद यात्रेचे स्वागत बॅनरवर नेते, पदाधिकारी व कार्यकर्त्यांचे बॅनर फाडल्याचा प्रकार धरणगावात पाहायला मिळाला.

जवळपास सहा ते सात ठिकाणी हे बॅनर फाडण्यात आले आहेत. प्रथमदर्शनी द्वेष भावनेतून शिवसेना, युवासेनेचे स्वागत बॅनर फाडल्याचा संशय व्यक्त केला जात असून, या घटनेमुळे शिवसेना पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी रोष व्यक्त केला आहे. शिवसेनेच्या या शिव संवाद यात्रेचे बॅनर अज्ञातांनी नक्कीच द्वेष भावनेतून फाडले असल्याची शंका पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी उपस्थित केल्याने शिवसैनिकांमध्ये संतापाची लाट दिसत असून शहरात मोठा वाद पेटण्याची शक्यता नाकारता येत नाही.

सदर घटनेची माहिती मिळताच धरणगाव पोलिस ठाण्याचे निरीक्षक राहुल खताळ व कर्मचारी यांनी घटनास्थळी जावून पाहणी केली. यावेळी शिवसेनेचे सहसंपर्क प्रमुख गुलाबराव वाघ, नगराध्यक्ष निलेश चौधरी, माजी उपनगराध्यक्ष देविदास बापू महाजन, नगरसेवक वासुदेव चौधरी, भागवत चौधरी, किरण अग्निहोत्री, रविंद्र जाधव, भरत माळी आदिंनी कार्यकर्त्यांना शांत राहण्याचा सूचना दिल्या.

धरणगाव पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक राहुल खताळ सो, यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी सांगितले की, कायदा सुव्यवस्था धोक्यात आणून असे कृत्य करणाऱ्यांना आम्ही सोडणार नाहीत. असे पो.नि.श्री. खताळ यांनी सांगितले.

Leave A Reply

Your email address will not be published.