‘दिग्दर्शक ओम राऊत’ यांच्या विरोधात गुन्हा दाखल

0

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क

 

दिग्दर्शक ओम राऊत (Om Raut) यांचा आगामी चितपट ‘आदिपुरुष’ (Adipurush) परत पुन्हा वादात सापडला आहे. सिनेमा गेल्या अनेक दिवसांपासून नकारात्मक कारणानं चर्चेत आहे. राम नवमीच्या मुहूर्तावर ‘आदिपुरूष’ च्या मेकर्सनी सिनेमाचं नवं पोस्टर रिलीज केलं होतं. या पोस्टरवरही चाहत्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली होती. आता याच पोस्टरमुळे ‘आदिपुरूष’चा दिग्दर्शक ओम राऊत तसेच चित्रपटातील कलाकारांविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सनातन धर्माचे प्रचारक संजय दीनानाथ तिवारी यांनी मुंबईच्या साकीनाका पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. मुंबई (Mumbai) उच्च न्यायालयाचे वकील आशिष राय (Ashish Rai) आणि पंकज मिश्रा यांच्यामार्फत तक्रार दाखल करण्यात आली आहे.‘आदिपुरूष’च्या नव्या पोस्टरमध्ये हिंदू पौराणिक कथांचे पात्र चुकीच्या पद्धतीने दाखवण्यात आले असून यामुळे लोकांच्या धार्मिक भावना दुखावल्या गेल्याचा दावा तक्रारीत करण्यात आला आहे.

 

‘आदिपुरुष’ चित्रपटाच्या पोस्टरमध्ये रामायणातील कलाकारांना जानवं न घालता दाखवण्यात आलं आहे आणि ते चुकीचे आहे. जाणव्याला हिंदू सनातनी धर्मात वेगळं महत्त्व आहे. शिवाय पोस्टरमध्ये सीता मातेच्या भूमिकेतील अभिनेत्री क्रिती सॅनॉनच्या (Kriti Sanon) भांगात कुंकू नाही. त्यामुळे तिला अविवाहित स्त्री दाखवण्यात आलं आहे. बॉलिवूड चित्रपट निर्माते, दिग्दर्शक आणि अभिनेत्यांनी हे जाणूनबुजून केल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे. याप्रकरणी आदिपुरुष दिग्दर्शक-निर्माता ओम राऊत आणि सर्व कलाकारांविरुद्ध आयपीसीच्या कलम २९५ (अ), २९८, ५००, ३४ अन्वये मुंबईतील साकीनाका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.