उद्यापासून राज्याचे अर्थसंकल्पीय अधिवेशन ; पूर्वसंध्येला विरोधकांचा बहिष्कार

0

उद्यापासून राज्याचे अर्थसंकल्पीय अधिवेशन ; पूर्वसंध्येला विरोधकांचा बहिष्कार

मुंबई वृत्तसंस्था

अधिवेशनाच्या पूर्वसंधेला सरकारकडून आयोजित करण्यात येणाऱ्या चहापानावर विरोधकांनी बहिष्कार टाकला आहे. उद्या 3 मार्चपासून अर्थसंकल्पीय अधिवेशनाला सुरूवात होणार आहे. विरोधकांकडून सरकारला घेरण्यासाठी तयारी केली आहे. लाडकी बहीण, शेतकरी कर्जमाफी, संतोष देशमुख हत्याकांड, कृषी विभाग घोटाळा, प्रशांत कोरटकर प्रकरणावरून सरकारला घेरणार असल्याचे महाविकास आघाडीने घेतलेल्या पत्रकार परिषदेमध्ये दिसून आले.

अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीतील तीनही पक्षांतील नेत्यांची बैठक विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्या अजिंक्यतारा बंगल्यावर पार पडली. यावेळी आमदार भास्कर जाधव, आमदार भाई जगताप, आमदार जितेंद्र आव्हाड, आमदार सुनील प्रभू, आमदार आदित्य ठाकरे आणि महाविकास आघाडीतील अन्य नेते उपस्थित होते.

 

 

 

 

Leave A Reply

Your email address will not be published.