Close Menu
लोकशाहीलोकशाही
    Facebook X (Twitter) Instagram
    Trending
    • जरांगे पाटील मुंबईत धडकणार; मोर्चाची रणनीती ठरली!
    • आता गुरुजी सांगणार देश-विदेशात ऑनलाइन गणेश स्थापना
    • कविवर्य ना. धों. महानोर साहित्य , शेती – पाणी पुरस्कार सोहळा
    • एमपीएससी परीक्षा प्रक्रिया : विद्यार्थ्यांसमोर शासन झुकले
    • एमपीएससीचे सचिव महेंद्र हरपाळकर यांना फासले काळे
    • अभिजीत दिपके अभी तो बच्चा है, कच्चा है!
    • जळगावसह उत्तर महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार
    • यावल तालुक्यात अवैध धंद्यांचा विळखा अधिकच घट्ट!
    Facebook X (Twitter) Instagram
    लोकशाहीलोकशाही
    Demo
    • होम
    • राष्ट्रीय
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
    • जळगाव
      • जळगाव जिल्हा
    • राजकारण
    • गुन्हे वार्ता
      • अपघात
    • संपादकीय
      • लोकशाही विशेष
    • व्हिडीओ
    • ई-पेपर
    • आणखी
      • हवामान
      • कृषी
      • नोकरी संदर्भ
      • आरोग्य
      • शैक्षणिक
      • खाद्य संस्कृती
      • राशी भविष्य
      • अध्यात्म
      • लोकार्थ
      • पॉडकास्ट
    लोकशाहीलोकशाही
    Home»महाराष्ट्र»पोंभूर्णा कृषी कार्यालयात कर्मचाऱ्यांची तीव्र कमतरता
    महाराष्ट्र

    पोंभूर्णा कृषी कार्यालयात कर्मचाऱ्यांची तीव्र कमतरता

    शेतकऱ्यांचे कामांसाठी हेलपाटे : उपलब्ध कर्मचाऱ्यांवर ताण
    Team Lokshahi LiveBy Team Lokshahi LiveJuly 16, 2026No Comments47 Views
    Facebook Twitter Pinterest LinkedIn WhatsApp Reddit Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

     

    पोंभूर्णा, लोकशाही न्यूज नेटवर्क

    पोंभूर्णा तालुका कृषी कार्यालयात आवश्यक मनुष्यबळ उपलब्ध नसल्याने शेतकऱ्यांची विविध शासकीय कामे रखडत असून, दररोज कार्यालयाच्या फेऱ्या माराव्या लागत आहेत. अनेक पदे रिक्त असल्याने उपलब्ध कर्मचाऱ्यांवर अतिरिक्त कामाचा ताण वाढला असून त्याचा थेट फटका शेतकरी व नागरिकांना बसत आहे.

    पीकविमा, पीक पाहणी, विविध कृषी योजनांचे प्रस्ताव, अनुदान प्रकरणे, ई-पीक नोंदणी, कृषी अवजारे अनुदान, बियाणे व खत योजनांसह विविध शासकीय कामे वेळेत पूर्ण होत नसल्याच्या तक्रारी वाढत आहेत. एकाच कर्मचाऱ्याकडे अनेक जबाबदाऱ्या असल्याने कार्यालयीन कामकाजावर परिणाम होत आहे.

    विशेषतः खरीप हंगाम सुरू असताना कृषी विभागाची भूमिका महत्त्वाची असते. मात्र कर्मचाऱ्यांच्या कमतरतेमुळे शेतकऱ्यांना आवश्यक मार्गदर्शन, योजनांची माहिती व सेवा वेळेवर मिळत नसल्याची खंत शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे.

    पोंभूर्णा कृषी कार्यालयातील रिक्त पदे तातडीने भरून आवश्यक कर्मचारी उपलब्ध करून द्यावेत, जेणेकरून शेतकऱ्यांची कामे सुरळीत व वेळेत होतील, अशी मागणी शेतकरी व नागरिकांकडून करण्यात येत आहे. तसेच या प्रश्नाकडे संबंधित विभागाने गांभीर्याने लक्ष देऊन तातडीने मनुष्यबळ उपलब्ध करून द्यावे, अशी अपेक्षाही व्यक्त केली जात आहे.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Telegram Email
    Team Lokshahi Live
    • Website

    Related Posts

    आता गुरुजी सांगणार देश-विदेशात ऑनलाइन गणेश स्थापना

    September 13, 2026

    कविवर्य ना. धों. महानोर साहित्य , शेती – पाणी पुरस्कार सोहळा

    September 11, 2026

    एमपीएससीचे सचिव महेंद्र हरपाळकर यांना फासले काळे

    September 11, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Lokshahi Live. Designed by ContentOcean Infotech.
    • Contact Us
    • About us

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

    whatsapp-Gif