Friday, December 9, 2022

अभिनेत्री तबस्सुम यांचे वयाच्या ७८ व्या वर्षी निधन…

- Advertisement -

 

- Advertisement -

नवी दिल्ली, लोकशाही न्यूज नेटवर्क:

- Advertisement -

लोकप्रिय अभिनेत्री तबस्सुम यांचे काल निधन झाले. त्या ७८ वर्षांच्या होत्या. त्यांचा मुलगा होशांग गोविल यांनी दिलेल्या माहितीनुसार, शुक्रवारी संध्याकाळी त्यांचे निधन झाले. त्यांच्या जाण्याने कुटुंबीयांना धक्का बसला आहे. ते म्हणाले, “काल रात्री 8.40 च्या सुमारास हॉस्पिटलमध्ये हृदयविकाराच्या झटक्याने त्यांचे निधन झाले.

- Advertisement -

त्या निरोगी होत्या आणि आणि कोणतीही समस्या नव्हती. त्यांनी त्यांच्या शोसाठी 10 दिवसांपूर्वी शूट केले होते आणि पुढच्या आठवड्यात त्या पुन्हा शूट करणार होत्या. हे अचानक घडले. ते म्हणाले, “त्यांना गॅस्ट्रोची समस्या होती, त्यामुळे त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. नंतर त्यांना डिस्चार्ज देण्यात आला, मात्र काल त्यांना पुन्हा दाखल करण्यात आले. दोन मिनिटांत त्यांना दोनदा हृदयविकाराचा झटका आला.

त्यांनी 1947 मध्ये बालकलाकार बेबी तबस्सुम म्हणून त्यांच्या करिअरला सुरुवात केली. त्यांनी 1972 ते 1993 या काळात लोकप्रिय दूरदर्शन सेलिब्रिटी टॉक शो “फूल खिले हैं गुलशन गुलशन” होस्ट केला होता. मजधार, दीदार आणि स्वर्ग या चित्रपटांसाठी त्या ओळखल्या जातात. त्यांना गेल्या वर्षीही कोरोनाची लागण झाली होती. त्यानंतर त्या जवळपास 10 दिवस हॉस्पिटलमध्ये होत्या.

- Advertisement -
spot_imgspot_img

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

हे वाचायलाच हवे

संबंधित बातम्या