Close Menu
लोकशाही लोकशाही
    Facebook X (Twitter) Instagram
    Trending
    • ओझरखेडा तलावामध्ये हतनूर धरणाचे पाणी!
    • TET पेपरफुटी : सोलापुरातून प्रशिक्षण केंद्र चालकाला अटक
    • मंत्रिमंडळ बैठकीत ७ महत्त्वाचे निर्णय
    • वेल्हाळे कपिलेश्वर महादेव मंदिरात १७ ऑगस्टला मुकुट सोहळा
    • राजस्थानमधील व्यापाऱ्याकडून सात लाखांची फसवणूक
    • पुन्हा मुख्यमंत्र्यांच्या हेलिकॉप्टरमध्ये तांत्रिक बिघाड
    • खिडकीतून मण्यार आता घुसला अन् होत्याचे नव्हते!
    • भर पावसातली महाबळेश्वर पिकनिक थेट जीवावर बेतली
    Facebook X (Twitter) Instagram
    लोकशाही लोकशाही
    Demo
    • होम
    • राष्ट्रीय
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
    • जळगाव
      • जळगाव जिल्हा
    • राजकारण
    • गुन्हे वार्ता
      • अपघात
    • संपादकीय
      • लोकशाही विशेष
    • व्हिडीओ
    • ई-पेपर
    • आणखी
      • हवामान
      • कृषी
      • नोकरी संदर्भ
      • आरोग्य
      • शैक्षणिक
      • खाद्य संस्कृती
      • राशी भविष्य
      • अध्यात्म
      • लोकार्थ
      • पॉडकास्ट
    लोकशाही लोकशाही
    Home»मनोरंजन»‘लापता लेडीज’मधील अभिनेत्याने रडत-रडत शेअर केला व्हिडीओ
    मनोरंजन

    ‘लापता लेडीज’मधील अभिनेत्याने रडत-रडत शेअर केला व्हिडीओ

    भावनिक व्हिडिओ व्हायरल; काय आहे नेमके प्रकरण
    Team Lokshahi LiveBy Team Lokshahi LiveJune 28, 2026No Comments234 Views
    Facebook Twitter Pinterest LinkedIn WhatsApp Reddit Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

     

    लोकशाही न्यूज नेटवर्क

    किरण राव दिग्दर्शित ‘लापता लेडीज’ या चित्रपटातून ओळख मिळवलेले अभिनेता सतेंद्र सोनी सध्या एका वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आला आहे. सोशल मीडियावर त्याचा एक भावनिक व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असून, त्यामध्ये तो अत्यंत घाबरलेला आणि व्यथित अवस्थेत दिसत आहे. या व्हिडिओनंतर त्याच्या चाहत्यांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.

    सतेंद्र सोनीने त्याच्या फेसबुक अकाउंटवर हा व्हिडिओ शेअर करत स्वतःसोबत घडलेल्या घटनेची माहिती दिली. त्याच्या म्हणण्यानुसार, मध्य प्रदेशातील मैहर येथे ‘पेट पालकी’ या चित्रपटाच्या शूटिंगसाठी त्याला बोलावण्यात आले होते. त्याने सलग आठ दिवस प्रामाणिकपणे शूटिंग पूर्ण केले. मात्र काम संपल्यानंतर निर्मात्याने त्याच्या मेहनतान्याचे पैसे देण्यास नकार दिल्याचा गंभीर आरोप त्याने केला आहे.

    व्हिडिओमध्ये सतेंद्र सोनी रडत-रडत सांगतो आहे की, जेव्हा त्याने आपल्या कामाचे मानधन मागितले, तेव्हा पैसे देण्याऐवजी त्याला धमकावण्यात आले. या प्रकारामुळे तो मानसिकदृष्ट्या खूप अस्वस्थ झाल्याचेही त्याने सांगितले. त्याच्या या भावनिक व्हिडिओमुळे सोशल मीडियावर मोठी चर्चा सुरू झाली असून, अनेकांनी छोट्या आणि नवोदित कलाकारांशी होणाऱ्या अशा वागणुकीवर संताप व्यक्त केला आहे.

    अनेक सोशल मीडिया वापरकर्त्यांनी कलाकारांच्या मेहनतीचे योग्य मूल्य दिले गेले पाहिजे, अशी मागणी केली आहे. चित्रपटसृष्टीत नवोदित कलाकारांना अशा प्रकारच्या अडचणींचा सामना करावा लागत असल्याचेही अनेकांनी नमूद केले आहे. दरम्यान, या संपूर्ण प्रकरणाबाबत अद्याप कोणत्याही अधिकृत यंत्रणेने किंवा संबंधित चित्रपट निर्मात्यांकडून अधिकृत प्रतिक्रिया आलेली नाही. त्यामुळे सतेंद्र सोनी यांनी केलेल्या आरोपांची स्वतंत्रपणे पुष्टी झालेली नाही.

    या घटनेनंतर चाहत्यांची चिंता वाढली असतानाच सतेंद्र सोनीने आणखी एक व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला. या व्हिडिओमध्ये तो रेल्वे स्थानकावर दिसत असून त्याच्या सोबत आणखी दोन व्यक्ती आहेत. त्यानी इंस्टाग्रामवर हा व्हिडिओ पोस्ट करत लिहिले, आम्ही मुंबईत सुरक्षित पोहोचलो आहोत. आम्हाला मदत करणाऱ्या मैहर (मध्य प्रदेश) पोलिसांचे आणि साथ देणाऱ्या सर्वांचे मनःपूर्वक आभार.या पोस्टनंतर त्याच्या चाहत्यांनी सुटकेचा निश्वास सोडला असून, अनेकांनी त्याना धीर देणाऱ्या प्रतिक्रिया दिल्या आहेत.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Telegram Email
    Team Lokshahi Live
    • Website

    Related Posts

    ‘गजिनी’ फेम प्रदीप रावत काळाच्या पडद्याआड

    August 5, 2026

    हेच मतदार आहेत. मग त्यांना का ट्रोल करता?

    July 30, 2026

    लक्षात ठेवा, विमानतळावर तुम्हाला कानाखाली मारली होती!

    July 29, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Lokshahi Live. Designed by ContentOcean Infotech.
    • Contact Us
    • About us

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

    whatsapp-Gif