जेष्ठ अभिनेते “भालचंद्र कुलकर्णी” काळाच्या पडद्याआड

0

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क

ज्येष्ठ अभिनेते भालचंद्र कुलकर्णी (Bhalchandra Kulkarni) यांचं निधन झालं आहे. त्यांनी वयाच्या ८८ व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. भालचंद्र कुलकर्णी यांचं निधन शनिवारी (18 मार्च) सकाळी कोल्हापूर याठिकाणी झालं आहे. साधा चित्रकर्मी, कलासंपन्न नाट्यकर्मी, लोककला अभ्यासक, अभिनेते, लेखक, दिग्दर्शक, गीतकार अशी भालचंद्र कुलकर्णी यांची ओळख होती. भालचंद्र कुलकर्णी यांच्या निधनानंतर कलाविश्वाचं मोठं नुकसान झालं आहे.. असं म्हणायला हरकत नाही. भालचंद्र कुलकर्णी यांनी ३०० पेक्षा अधिक सिनेमांमध्ये महत्त्वाची भूमिका साकारत प्रेक्षकांचं मनोरंजन केलं… आता त्यांच्या निधनाने कलाविश्वाला मोठा धक्का बसला आहे.

कोल्हपूर याठिकाणी अल्पशा आजाराने भालचंद्र कुलकर्णी यांचं निधन झालं. भालचंद्र कुलकर्णी यांची अंत्ययात्रा त्यांच्या निवासस्थानापासून जवळपास सकाळी साडेअकराच्या सुमारास निघणार आहे. तर दुपारी १२ वाजता कोल्हापुरातील पंचगंगा स्मशानभूमी याठिकाणी भालचंद्र कुलकर्णी यांच्याव अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.