Close Menu
लोकशाहीलोकशाही
    Facebook X (Twitter) Instagram
    Trending
    • जरांगे पाटील मुंबईत धडकणार; मोर्चाची रणनीती ठरली!
    • आता गुरुजी सांगणार देश-विदेशात ऑनलाइन गणेश स्थापना
    • कविवर्य ना. धों. महानोर साहित्य , शेती – पाणी पुरस्कार सोहळा
    • एमपीएससी परीक्षा प्रक्रिया : विद्यार्थ्यांसमोर शासन झुकले
    • एमपीएससीचे सचिव महेंद्र हरपाळकर यांना फासले काळे
    • अभिजीत दिपके अभी तो बच्चा है, कच्चा है!
    • जळगावसह उत्तर महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार
    • यावल तालुक्यात अवैध धंद्यांचा विळखा अधिकच घट्ट!
    Facebook X (Twitter) Instagram
    लोकशाहीलोकशाही
    Demo
    • होम
    • राष्ट्रीय
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
    • जळगाव
      • जळगाव जिल्हा
    • राजकारण
    • गुन्हे वार्ता
      • अपघात
    • संपादकीय
      • लोकशाही विशेष
    • व्हिडीओ
    • ई-पेपर
    • आणखी
      • हवामान
      • कृषी
      • नोकरी संदर्भ
      • आरोग्य
      • शैक्षणिक
      • खाद्य संस्कृती
      • राशी भविष्य
      • अध्यात्म
      • लोकार्थ
      • पॉडकास्ट
    लोकशाहीलोकशाही
    Home»गुन्हे वार्ता»भुसावळमध्ये बांगलादेशी महिलेवर कारवाई
    गुन्हे वार्ता

    भुसावळमध्ये बांगलादेशी महिलेवर कारवाई

    बनावट कागदपत्रांद्वारे वास्तव्यास असल्याचा आरोप
    Team Lokshahi LiveBy Team Lokshahi LiveMay 20, 2026No Comments348 Views
    Facebook Twitter Pinterest LinkedIn WhatsApp Reddit Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

     

    लोकशाही न्यूज नेटवर्क

    भुसावळ बाजारपेठ पोलीस ठाण्याच्या हद्दीत बेकायदेशीररीत्या भारतात वास्तव्यास असलेल्या एका महिलेविरुद्ध कारवाई करण्यात आली आहे. संबंधित महिलेविरुद्ध इमिग्रेशन आणि परदेशी कायदा २०२५ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून या प्रकरणामुळे परिसरात खळबळ उडाली आहे. यापूर्वी जळगाव येथेही अशाच प्रकारचे प्रकरण समोर आले होते.

    पोलिस तपासात संबंधित महिलेचे मूळ नाव फरीदा बेगम मोहम्मद खान (वय ४२) असून ती बांगलादेशातील पीरोजपूर जिल्ह्यातील रहिवासी असल्याचे समोर आले. भारतात आल्यानंतर ती “जस्मिन बी मोहम्मद खान” या नावाने भुसावळातील दीनदयाल नगर परिसरात राहत होती.

    प्राथमिक चौकशीत तिने २००९ मध्ये दलालाच्या मदतीने नदीमार्गे पश्चिम बंगालमध्ये बेकायदेशीर प्रवेश केल्याची माहिती पोलिसांना दिली. त्यानंतर ती रेल्वेने भुसावळ येथे आल्याचे तपासात उघड झाले. पोलिसांनी तिच्याकडील मोबाईल जप्त करून तांत्रिक तपास केला असता, बांगलादेशातील क्रमांकांशी सातत्याने संपर्क झाल्याचे आढळून आले. तसेच मोबाईलमध्ये तिच्या जन्मदाखल्याची प्रतही मिळाली.

    तपासादरम्यान संबंधित महिलेने विविध कागदपत्रांचा वापर करून रेशन कार्ड, आधार कार्ड, मतदान ओळखपत्र, पॅन कार्ड, बँक पासबुक तसेच भारतीय पासपोर्ट तयार करून घेतल्याचे निष्पन्न झाले. या पासपोर्टच्या आधारे ती मे २०२३ मध्ये बांगलादेशात जाऊन पुन्हा भारतात परतल्याची माहिती समोर आली आहे. या प्रकरणात बनावट कागदपत्रे तयार करून देणारे एजंट, दलाल आणि संबंधित व्यक्तींचा शोध सुरू असून पोलीस अधिक तपास करत आहेत.

    #भुसावळ BangladeshiWoman CrimeNews IllegalImmigration MarathiNews PoliceAction जळगाव
    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Telegram Email
    Team Lokshahi Live
    • Website

    Related Posts

    एमपीएससीचे सचिव महेंद्र हरपाळकर यांना फासले काळे

    September 11, 2026

    जळगावसह उत्तर महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार

    September 11, 2026

    यावल तालुक्यात अवैध धंद्यांचा विळखा अधिकच घट्ट!

    September 11, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Lokshahi Live. Designed by ContentOcean Infotech.
    • Contact Us
    • About us

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

    whatsapp-Gif