Close Menu
लोकशाही लोकशाही
    Facebook X (Twitter) Instagram
    Trending
    • पारडी येथे “आदिवासी सल्ला शक्ती स्थापना दिन” उत्साहात
    • भुसावळच्या प्रभारी नगराध्यक्ष शैलजा नारखेडे यांचे अभिनंदन!
    • खालसा हेल्प फाउंडेशनची कार्यकारिणी जाहीर
    • पुढील 3 दिवसात विक्रमी तापमानाची नोंद होणार
    • आरटीआय कार्यकर्त्याची भरदिवसा ठेचून हत्या
    • लासूर येथे वारकरी बालसंस्कार शिबिर उत्साहात
    • तीन लहान मुलांनी आरोपीला रोखण्याचा केला होता प्रयत्न
    • सूर्यनारायण कोपला.. काळजी घ्या..!
    Facebook X (Twitter) Instagram
    लोकशाही लोकशाही
    Demo
    • होम
    • राष्ट्रीय
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
    • जळगाव
      • जळगाव जिल्हा
    • राजकारण
    • गुन्हे वार्ता
      • अपघात
    • संपादकीय
      • लोकशाही विशेष
    • व्हिडीओ
    • ई-पेपर
    • आणखी
      • हवामान
      • कृषी
      • नोकरी संदर्भ
      • आरोग्य
      • शैक्षणिक
      • खाद्य संस्कृती
      • राशी भविष्य
      • अध्यात्म
      • लोकार्थ
      • पॉडकास्ट
    लोकशाही लोकशाही
    Home»गुन्हे वार्ता»आरोपीचा भररस्त्यात वाढदिवस : पोलिसांनी भरवला केक
    गुन्हे वार्ता

    आरोपीचा भररस्त्यात वाढदिवस : पोलिसांनी भरवला केक

    लैंगिक शोषण, अश्लील व्हिडिओ प्रकरणी तपासावर प्रश्न!
    Team Lokshahi LiveBy Team Lokshahi LiveApril 17, 2026No Comments588 Views
    Facebook Twitter Pinterest LinkedIn WhatsApp Reddit Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

     

    लोकशाही न्यूज नेटवर्क

    अमरावती जिल्ह्यातील परतवाडा येथील लैंगिक शोषण आणि अश्लील व्हिडिओप्रकरणातील आरोपी मोहम्मद अयाज मोहम्मद तनवीर हा अघ्या 19 वर्षांचा आहे. त्याच्यासोबत त्याच्या इतर आरोपींनाही पोलिसांनी अटक केली आहे. तर आरोपीने परतवाड्यातील एका हमरस्त्यावर त्याचा मध्यरात्री वाढदिवस साजरा करण्यात आला. त्यावेळी पोलिसांनी त्याला केक भरवल्याचा व्हिडिओ सध्या व्हायरल झाला आहे. त्यामुळे याप्रकरणात तपास निःपक्ष कसा होईल असा सवाल करण्यात येत आहे. त्याच्या वाढदिवसाला पोलिसांची हजेरी तपासावरच प्रश्नचिन्ह निर्माण करणारी आहे.

    परतवाडा येथील एका हमरस्त्यात हा वाढदिवस साजरा करण्यात आला. व्हिडिओ डिसेंबर 2025 मधील आहे. या व्हिडिओत त्याचे मित्र आणि गुन्ह्यातील आरोपी स्पष्ट दिसत आहेत. तर त्याचवेळी एक सहाय्यक पोलीस निरीक्षक आणि दोन पोलीस कर्मचारी सुद्धा याव्हिडिओत सहभागी झाल्याचे दिसते. पोलिसांनी वाहन थांबवले आणि ते वाढदिवसाच्या सोहळ्यात सहभागी झाले. त्यांनी आरोपीला केकही खाऊ घातल्याचे दिसत आहे. यामुळे आरोपीचे पोलिसांसोबत एकदम घनिष्ठ संबंध असल्याचे समोर येत आहे.

    व्हिडिओत आरोपी आयाज हा भररस्त्यात वाढदिवस साजरा करत असल्याचे दिसते. रस्त्याच्या मध्यभागी एक टेबल आणि त्यावर केक दिसतो. आरोपी केक कापतो. त्याचे मित्र टाळ्या वाजवतात. यावेळी आकाशात आतषबाजी करण्यात येते. मित्र आणि इतर लोक त्याला केक खाऊ घालतात. तर त्याचवेळी एक पोलीस त्याला केक खाऊ घालतो. तर इतर आरोपी पोलिसांना केक खाऊ घालताना दिसतात. भररस्त्यात वाढदिवस साजरा करण्याविषयी विचारणा करण्याऐवजी पोलिसच त्याला केक खाऊ घालत असल्याचे दिसते. त्यामुळे पोलिसांच्या एकूणच वर्तणुकीवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.

    अमरावती जिल्ह्यातील परतवाडा शहरातील लैंगिक शोषण आणि अश्लील व्हिडिओ व्हायरल केल्या प्रकरणात वातावरण तापले आहे. उद्या पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे हे पोलीस अधीक्षक विशाल आनंद, एसआयटीचे प्रमुख सहाय्यक पोलीस अधीक्षक शुभम कुमार, गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक व अन्य महत्त्वाच्या पोलीस अधिकाऱ्यांसोबत बारा वाजता बैठक घेणार आहेत. त्यानंतर परतवाडामध्ये देखील बावनकुळे भेट देतील.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Telegram Email
    Team Lokshahi Live
    • Website

    Related Posts

    पारडी येथे “आदिवासी सल्ला शक्ती स्थापना दिन” उत्साहात

    May 14, 2026

    खालसा हेल्प फाउंडेशनची कार्यकारिणी जाहीर

    May 13, 2026

    पुढील 3 दिवसात विक्रमी तापमानाची नोंद होणार

    May 13, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Lokshahi Live. Designed by ContentOcean Infotech.
    • Contact Us
    • About us

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

    whatsapp-Gif