कारागृहातच एका आरोपीने केला दुसऱ्याचा खून..!

जळगावच्या कारागृहात मध्यरात्री घडला थरार

0

 

जळगाव | लोकशाही न्यूज नेटवर्क 

 

जिल्ह्यात खुनाच्या घटना नेहमीच्याच झालेल्या दिसून येत आहेत. अश्यात पोलिसांवर तपासाबाबत आरोप प्रत्यारोपही सातत्याचे झाले आहेत. अश्याच खुनाच्या घटना सुरु असतांना आज पहाटे मात्र कहरच झाला.. चक्क जळगाव जेलमधील एका आरोपीची दुसऱ्या आरोपीने आपसातील वादातून हत्या केल्याची घटना घडली आहे. यामुळे जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.

 

प्राथमिक मिळालेल्या माहितीनुसार, भुसावळचे माजी नगरसेवक रवींद्र बाबूराव खरात ( वय ५५) यांची ७ ऑक्टोबर २०१९ रोजी भुसावळात हत्या झाली होती. या प्रकरणातील आरोपींना अटक अटक करून जळगाव कारागृहात ठेवण्यात आले होते. या प्रकरणातील एक आरोपी मोहसीन असगर खान याचे कारागृहातीलच दुसऱ्या आरोपीशी भांडण झाले.

दरम्यान दोन्हींमध्ये काल दुपारपासून वाद सुरू होता. या रागातून  मध्यरात्री सुमारे दीड वाजेच्या सुमारास दुसर्‍या आरोपीने मोहसीन असगर खान (वय ३४) याच्यावर हल्ला करत गंभीर जखमी केले. असगरला तातडीने रूग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र त्याला मृत घोषीत करण्यात आले.

आधीच जिल्हाभरात होणाऱ्या गुन्ह्यांच्या घटनातील तपासाबाबत पोलिसांच्या कार्यपद्धतीबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित होत असताना, आज पहाटे चक्क कारागृहात घडलेल्या या घटनेने जिल्ह्यातील पोलीस यंत्रणेकडे अधिक संशयात्मक वृत्तीने पाहिले जात आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.