आरोपी अक्षय शिंदेला 24 ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी

न्यायालयात हजर करण्यापूर्वी मोठा पोलीस बंदोबस्त तैनात

0

 

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क 

बदलापुरातील शाळेत शिकणाऱ्या दोन चिमुकल्यांवर लैंगिक अत्याचार झाल्याची धक्कादायक घटना घडली. या घटनेचे पडसाद संपूर्ण महाराष्ट्रात उमटताना दिसत आहेत. या घटनेनंतर काल बदलापुरात मोठे आंदोलन करण्यात आले. याप्रकरणी पोलिसांनी अक्षय शिंदे या मुख्य आरोपी अटक केली होती. आता आरोपी अक्षय शिंदेला 24 ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.

 

आरोपी अक्षय शिंदेला पोलिसांनी कल्याण न्यायालयात हजर केले होते. याप्रकरणी आता कोर्टाने महत्त्वपूर्ण आदेश दिले आहेत. आरोपी अक्षय शिंदेला 24 ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. कल्याण न्यायालयातील न्यायाधीश वी ए पत्रावळे यांच्या दालनात ही सुनावणी पार पडली. यावेळी विशेष सरकारी वकील अश्विनी भामरे पाटील यांनी युक्तीवाद केला.

 

यावेळी पोलिसांनी आरोपीने केलेले कृत्य याबाबत तपास करायचा असल्याचे सांगितले. पोलिसांनी आरोपी अक्षय शिंदेला 17 ऑगस्टला अटक केली होती. त्यानंतर न्यायालयाने 21 ऑगस्टपर्यंत त्याला पोलीस कोठडी सुनावली होती. यानंतर आज पुन्हा आरोपीला न्यायालयात हजर करण्यात आले होते. यावेळी कल्याण न्यायालयाने तपासातंर्गत 24 ऑगस्टपर्यंत ही पोलीस कोठडी वाढवली आहे.

 

कल्याण न्यायालयात मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. बदलापूर अत्याचार प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदे याला न्यायालयात हजर करण्यापूर्वी मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. काल आरोपीला फाशी द्या अशी मागणी बदलापूरकरांकडून केली जात होती. बदलापुरातील पालक आणि नागरिकांचा रोष पाहता आरोपीवर हल्ला होऊ शकतो, अशी शक्यता वर्तवण्यात येत होती. त्यामुळे कायदा सुव्यवस्था पाहता पोलिसांनी स्टेशन परिसरासह कल्याण न्यायालयात मोठा पोलीस बंदोबस्त ठेवला आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.