दोन गावठी पिस्तूलासह संशयित जेरबंद ; गुन्हा दाखल

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क

जळगाव शहरातील मासूमवाडी येथे आठवडे बाजार परिसरात दोन गावठी पिस्तूल सोबत घेवून फिरणाऱ्या तरुणाला अटक केली असून त्याच्याकडून दोन गावठी पिस्तूल हस्तगत करण्यात आला आहे. याप्रकरणी एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अटक केलेल्या संशयित आरोपीचे नाव अली उर्फ डॉलर शाहरुख शकील अली (वय २९, रा. गेंदालाल मील, जळगाव) आहे. जळगाव शहरातील मासूमवाडी येथील आठवडे बाजार परिसरात बुधवार १६ मार्च रोजी सायंकाळी ५.३० वाजेच्या सुमारास गावठी पिस्तूल विक्री करण्याच्या उद्देशाने घेऊन फिरत असल्याची गोपनीय माहिती एमआयडीसी पोलिस ठाण्याचे पो.ना. सुधिर सावळे, पो.ना. हेमंत कळसकर आणि पो.कॉ. चंद्रकांत पाटील यांना मिळाली.

या गुप्त माहितीनुसार एमआयडीसी पोलीस ठाण्याचे सहाय्यक फौजदार अतुल वंजारी, पो.ना. हेमंत कळसकर, सुधीर सावळे, इम्रान सैय्यद, सचिन पाटील, मुदस्सर काझी, पो.कॉ. साईनाथ मुंडे, चंद्रकांत पाटील हे तात्काळ मासूमवाडी येथील आठवडे बाजार येथे रवाना झाले. याठिकाणी संशयित आरोपी अली उर्फ डॉलर शाहरुख शकील अली हा संशयास्पद हालचाली करत असतांना आढळून आल्याने त्याला पाठलाग करून अटक केली.

दरम्यान त्याची चौकशी केली असता त्याच्याजवळ २ गावठी पिस्तूल त्याच्याकडे आढळून आले. सदरील गावठी पिस्तूल विक्री करण्याच्या उद्देशाने त्यांनी आणले असल्याची माहिती पोलीसांना मिळाली. याप्रकरणी पोलीस कॉन्स्टेबल चंद्रकांत पाटील यांच्या फिर्यादीवरून एमआयडीसी पोलीस ठाण्यात रात्री उशीर गुन्हा दाखल करण्यात आला.

आज न्यायालयातील न्यायमूर्ती ए. एस. शेख यांच्या न्यायालयात हजर केले असता संशयिताला शनिवार १९ मार्चपर्यंत पोलीस कोठडी देण्यात आली आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक प्रताप शिकारे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक फौजदार अतुल वंजारी, पो.ना. सचिन पाटील करीत आहे.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here