रेल्वेच्या धडकेत अनोळखी इसमाचा मृत्यू

0

रेल्वेच्या धडकेत अनोळखी इसमाचा मृत्यू

जळगाव प्रतिनिधी शहरातील आत्महत्या कॉलनीजवळील रेल्वे रुळांवर एका ३० ते ३५ वर्षे वयोगटातील अनोळखी व्यक्तीचा मृतदेह आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. ही घटना २० एप्रिल रोजी सकाळच्या सुमारास उघडकीस आली. याप्रकरणी रामानंद नगर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

रेल्वे रुळाजवळ मृतदेह असल्याची माहिती स्थानिक नागरिकांनी पोलिसांना दिल्यानंतर पोलीस कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. मृत व्यक्तीची ओळख अद्याप पटलेली नसून, रेल्वेच्या धडकेमुळे मृत्यू झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.शवविच्छेदनासाठी मृतदेह शासकीय वैद्यकीय रुग्णालयात पाठवण्यात आला आहे.

या घटनेचा तपास पोलीस हवालदार सुशील चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू असून, मृत व्यक्तीची ओळख पटवण्यासाठी पोलीस प्रयत्नशील आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.