चुंचाळे फाटा ते साकळी रस्ता ठरतोय जीवघेणा ; अपघातांची मालिका सुरूच !
याच रस्त्यांवर आतापर्यंत झाले ७ ते ८ आपघातांमध्ये वाहने पलटी ; भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणचे दुर्लक्ष
चुंचाळे फाटा ते साकळी रस्ता ठरतोय जीवघेणा ; अपघातांची मालिका सुरूच !
याच रस्त्यांवर आतापर्यंत झाले ७ ते ८ अपघातांमध्ये वाहने पलटी ; भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणचे दुर्लक्ष
चुंचाळे प्रतिनिधी
अंकलेश्वर ते बुऱ्हाणपूर मुख्य रस्त्यावर साकळी आणि चुंचाळे फाट्या जवळ वळण रस्त्यावर सातत्याने अपघातांची मालिका सुरु असून हा रस्ता जीवघेणा ठरत असल्याचे पाहायला मिळत आहे. आज पुन्हा एकदा मोठा ट्रक पलटी झाल्याने भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण च्या कामांबत प्रश्न चिन्ह निर्माण झाले असून या रस्त्याच्या अवस्थेकडे लक्ष देण्याची मागणी परिसरातील नागरिकांकडून व्यक्त होत आहे. दरम्यान या अगोदर याच रस्त्यावर सात ते आठ वाहने पलटी झाल्याच्या घटना घडल्या आहे.
सविस्तर वृत्त असे कि मलकापूर हुन गुजरात राज्यात जाणाऱ्या मालगाडी क्रमांक जी.जे ०४ ए.टी. ७२०४ (बारा चक्का ट्रक) गठानी ने भरून (रुईचा कच्चा माल) घेऊन जात असतांना साकळी गावाच्या पुढे आणि चुंचाळे फाट्याच्या मागे दोन टर्न असलेल्या जागेवर पहाटेच्या सुमारास गाडी चालकाचे नियंत्रण सुटलाने गाडी पलटी झाल्याचे चित्र आहे तर गाडी रस्त्यावरून थेट हरबऱ्याच्या शेतात पलटी झाल्याचे दिसते, अद्याप गाडी चालक आणि क्लीनर किरकोळ जखमी झाले असून मोठा अपघात होतांना वाचला आहे, मोठा अनर्थ टळला आहे.
आता पर्यंत या जागी सात ते आठ माळ वाहतूक करणारी वाहने पलटी
या अगोदर सुद्दा याच जागेवर सात ते आठ मालगाड्या पलटी झालेल्या आहेत,रसगुल्ला मिर्ची ची ट्रक, एल्बो पाईप ची ट्रक,आणि अश्या अनेक गाड्याचा अपघात झाला आहे,मात्र आता पर्यंत कोणत्याच वृत्त पत्रात सदर अपघातां विषयी कोणतीच बातमी नाही किव्वा पोलीस प्रशासनाने याची दखल घेतली किव्वा नाही हे कळले नाही.
एन. एच. ने दखल घेण्याची गरज अन्यथा अनेकांना आपला जीव गमवावा लागेल?
रस्ता हा अगोदर बांधकाम विभाग यांच्या कडे होता मात्र, अनेक वेळा रस्ता खराब झाल्यामुळे हा रस्ता आता नॅशनल हायवे च्या अंतर्गत होत असल्याचे सांगण्यात येत आहे, तसेच,बुऱ्हाणपूर ते अंकलेश्वर रस्त्याचे डांबरीकरण चे काम, रावेर ते धानोरा गावापर्यंत जवळ जवळ संपुष्टात आले असून, सदर रस्त्यावर कोणतेच सूचना फलक लावलेले नाहीत, गतीरोधक टाकलेले नाहीत किव्वा कोणत्याच ठिकाणी रस्ता दिशादर्शक सूचना फलक लावलेले नाहीत,
या कारणाने आता पर्यंत या रस्त्यावर येजा करणाऱ्या अनेक वाहनांचा अपघात झाला आहे, तरी या नंतर सुद्धा अश्या मोठ्या अपघातांना निवते दिलें जाईल आणि कळत न कळत एखादा मोठा अपघात होऊन जाणून बुजून जनतेला बळी पाडण्याचे काम नॅशनल हायवे चे अधिकारी कर्मचारी करत आहेत का? असा प्रश्न निर्माण होतो.