Tuesday, May 24, 2022

पुणे – नगर महामार्गावर अपघातात; ५ जण ठार

spot_imgspot_img
- Advertisement -
- Advertisement -

लोकशाही न्यूज नेटवर्क 

- Advertisement -

पुणे

- Advertisement -

 

शिक्रापूर :येथे ट्रक ने धडक देऊन ५ जण ठार झाले. पुणे-नगर महामार्गावरील शिक्रापूर येथे २४वा मैलनजीक ट्रकने कार आणि दोन दुचाकींना दिलेल्या धडकेत पाच जण ठार झाल्याची घटना रविवारी सायंकाळी ७.३० वाजता घडली.

अपघातातील एका जखमीला तत्काळ रुग्णालयात उपचारार्थ दाखल केले आहे. विठ्ठल हिंगाडे, रेश्मा विठ्ठल हिंगाडे (रा. पारनेर), लिना निकसे (रा. दांडेकर पूल पुणे) व अन्य दोन जण (नावे समजू शकली नाहीत) यांचा मृत्यू झाला आहे.

घटनास्थळ व पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पुणे-नगर महामार्गावरून रविवारी सायंकाळी ७.३० वाजण्याच्या सुमारास नगरच्या दिशेने ट्रक निघाला होता. त्यावेळी दुसऱ्या लेनवरून एक कार आणि दोन दुचाकी पुणे बाजूकडे येत होत्या. शिक्रापूर येथील २४ वा मैलनजीक अचानकपणे ट्रक दुभाजकावरून दुसऱ्या लेनवर गेला अन् समोरून येणाऱ्या दोन दुचाकी आणि कारला जोराची धडक दिली.

यामध्ये एका दुचाकीवरील हिंगाडे दाम्पत्याचा, कारमधील लिना निकसे तसेच अन्य एक जणांचा मृत्यू झाला. दरम्यान, दोन जखमींना रुग्णालयात घेऊन जात असताना वाटेत एका जखमीचा मृत्यू झाला. अन्य दोन मृतांची ओळख पटविण्याचे काम रात्री उशिरापर्यंत सुरू होते. तसेच अपघात नेमका कसा झाला हे देखील समजू शकले नाही.

 

- Advertisement -
spot_imgspot_img

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

हे वाचायलाच हवे

संबंधित बातम्या