बारीच्या भवानी घटाडीखाली वाळू वाहतूक करणारा डंपर उलटला; चालक बचावला

0

लोहारा ता.पाचोरा, लोकशाही न्यूज नेटवर्क

लोहारा परिसरात अवैध गौण खनिजाची अनधिकृत तस्करी होत आहे. याकडे महसूल / पोलीस प्रशासनाचं दुर्लक्ष त्याचबरोबर भूमातेचा खजिना केव्हाही लुटता येतो असं सर्वश्रुत व त्यांना रान मोकळे असल्याने केव्हाही आणि कसही प्रयत्न करता येतात ही नीतिमत्ता परिसरात यशस्वी होतेय अस गृहीत धरून नदी-नाले यांचे लचके तोडून महसूल प्रशासनाच्या नाकावर टिच्चून रेती आणि मुरूम तत्सम वाहतूक बिनदिक्कतपणे सुरू आहे.

याकडे संबंधित प्रशासनाचा कानाडोळा होतोय हे दिसत असताना महसूल प्रशासन व पोलीस प्रशासन यांनी गेंड्याची कातडी पांघरली असे दिसून येते हा भाग नसता तर चोरटी वाळू वाहतूक झाली नसती तर अपघात घडला नसता अस म्हटलं तर वावग ठरणार नाही. यामुळेच असा अपघात पाचोरा येथून लोहाराकडे येणाऱ्या डंपर क्रमांक एमएच.४० बीएल-८६०७ याचा दुपारी ३:४५ मिनिटात झाला यात चालक लखन सुभाष चौधरी राहणार पहूर ता. जामनेर यांचा वाहनावरील ताबा सुटल्याने आऊट साईडला पलटी झाला होता.

यात रेती भरलेली होती पण तो कोणत्या गावाला घेऊन चालला होता त्याने सांगितले नाही तो डंपर पलटी झाल्याने त्याचा पाय दबलेला होता येणाऱ्या प्रत्येक मदतनिसास अडकलेला पाय काढा अशी विनवणी करीत होता मन हेलावणारा आवाज येत असल्याने यामुळे उपस्थित नागरिकांनी त्याच्या मानसिकतेचा विचार करता त्याला काढण्याचा प्रयत्न केला पण वजनदार डंपरमध्ये असल्याने अयशस्वी ठरला. पत्रकार ज्ञानेश्वर राजपुत त्याला काढणेसाठी उपस्थितांना मदतीचे आवाहन करीत होते.

अखेर काही मिनिटांनंतर जेसीबी मशीनच्या साहाय्याने आडवे डंपर कडून त्यास बाहेर काढण्यात आले व सुटकेचा निश्वास सोडण्यात आला त्याच्या पायाला किरकोळ जखम झाली होती. उपस्थित अशा परिस्थितीत त्याने आभार म्हणून उपचारार्थ गेला. पोलीस प्रशासन बाजूला सोडा हो कधीही महसूल प्रशासनाची सिंघम कारवाई परिसरात झालेली नाही म्हणजेच कारवाई झाली तर वर्चस्वातील अधिकारी कोण हा प्रश्न निर्माण होईल याबाबत अपघाताची नोंद झालेली आहे किंवा नाही हेडकोन्स्टेबल यांनी फोन उचलला नाही व अपघातस्थळी मदत म्हणून पोलीस कर्मचारी दाखल झालेले नव्हते.

Leave A Reply

Your email address will not be published.