Close Menu
लोकशाहीलोकशाही
    Facebook X (Twitter) Instagram
    Trending
    • दुष्काळात शेतकरी, शेतमजुरांसाठी मजुरी, अन्नधान्य व पाण्याचे नियोजन!
    • समृद्धी महामार्गावर टायर फुटताच ट्रकने घेतला पेट
    • शेतकरी-शेतमजुरांना रोजगार, अन्नधान्य, पाण्याचे सूक्ष्म नियोजन!
    • पोलिस दलात 23 हजारांहून अधिक पदे रिक्त
    • ज्येष्ठ अभिनेत्री मधू कांबीकर काळाच्या पडद्याआड
    • पोलिसांना आम्ही 24 तासांची वेळ देतोय. जंतर-मंतरवर…
    • आम्हाला वाटतं ज्ञानेश कुमार यांना जास्त प्रोटेक्ट करावं!
    • व्होट चोरीची चौकशी माझ्या मतदारसंघापासून सुरू करा!
    Facebook X (Twitter) Instagram
    लोकशाहीलोकशाही
    Demo
    • होम
    • राष्ट्रीय
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
    • जळगाव
      • जळगाव जिल्हा
    • राजकारण
    • गुन्हे वार्ता
      • अपघात
    • संपादकीय
      • लोकशाही विशेष
    • व्हिडीओ
    • ई-पेपर
    • आणखी
      • हवामान
      • कृषी
      • नोकरी संदर्भ
      • आरोग्य
      • शैक्षणिक
      • खाद्य संस्कृती
      • राशी भविष्य
      • अध्यात्म
      • लोकार्थ
      • पॉडकास्ट
    लोकशाहीलोकशाही
    Home»अपघात»रायपूरजवळ दोन दुचाकींची भीषण धडक; तरुणाचा जागीच मृत्यू
    अपघात

    रायपूरजवळ दोन दुचाकींची भीषण धडक; तरुणाचा जागीच मृत्यू

    Team Lokshahi LiveBy Team Lokshahi LiveOctober 15, 2025Updated:October 15, 2025No Comments0 Views
    Facebook Twitter Pinterest LinkedIn WhatsApp Reddit Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    रायपूरजवळ दोन दुचाकींची भीषण धडक; तरुणाचा जागीच मृत्यू

    जळगाव प्रतिनिधी

    जळगाव : तालुक्यातील रायपूर गावाजवळ दोन दुचाकींचा समोरासमोर झालेल्या भीषण अपघातात एका तरुणाचा जागीच मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी मंगळवार, दि. १४ ऑक्टोबर रोजी एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मृत तरुणाचे नाव सुनिल भिका बनसोडे (वय ३८, रा. रायपूर कुसुंबा, ता. जळगाव) असे आहे.

    सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, सुनिल बनसोडे हे आपल्या कुटुंबियांसह रायपूर कुसुंबा गावात वास्तव्यास होते. ते मजुरी करून उदरनिर्वाह करत होते. १२ ऑक्टोबर रोजी रात्री सुमारास ९.३० वाजता ते सुप्रिम कॉलनी येथून दुचाकीने रायपूरकडे जात असताना, रायपूर गावाजवळ समोरून येणाऱ्या भरधाव दुचाकीने त्यांच्या वाहनाला जोरदार धडक दिली. या अपघातात सुनिल बनसोडे यांच्या डोक्याला गंभीर दुखापत होऊन त्यांचा जागीच मृत्यू झाला.

    या घटनेनंतर मृताच्या पत्नी रूपाली बनसोडे यांनी एमआयडीसी पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. त्यानुसार पोलिसांनी दुसऱ्या दुचाकीस्वार विलास सुधाकर कोळी (रा. कुसुंबा, ता. जळगाव) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पोहेकॉ चंद्रकांत पाटील करीत आहेत.

    https://lokshahilive.com/wp-content/uploads/2026/09/WhatsApp-Video-2026-09-16-at-10.29.50-PM.mp4

    #crime accident jalgaon MIDC Police MIDC Police Station
    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Telegram Email
    Team Lokshahi Live
    • Website

    Related Posts

    समृद्धी महामार्गावर टायर फुटताच ट्रकने घेतला पेट

    October 12, 2026

    जळगाव पोलिसांनी उधळला गँगवारचा डाव

    October 12, 2026

    आकांक्षा म्हेत्रेला सुवर्णपदक; राष्ट्रीय विद्यापीठ स्पर्धेसाठी निवड

    October 11, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Lokshahi Live. Designed by ContentOcean Infotech.
    • Contact Us
    • About us

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

    whatsapp-Gif