दुर्देवी.. अपघातात सातवीच्या विद्यार्थिनीचा मृत्यू

पाच जण जखमी, अ‍ॅपेरिक्षा व मालवाहू रिक्षामध्ये धडक

0

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क 

फैजपूर ते आमोदा रस्त्यावर भीषण अपघात झालाय.  अ‍ॅपेरिक्षा व मालवाहू रिक्षाची समोरासमोर धडक होऊन झालेल्या अपघातात सातवीतील विद्यार्थिनीचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना ४ मे रोजी घडली. आदिती सोपान खडसे (वय १३) असं मयत विद्यार्थिनीचे नाव असून या अपघातात पाच जण जखमी झाले.

मिळालेल्या माहितीनुसार , सावदा येथून भुसावळला प्रवासी वाहतूक करणारी अपे रिक्षा (क्र.एमएच.१९-सीव्ही. ३५९०) सातवीतील विद्यार्थी सार्थ शंतनू सरोदे (गणेश आयुर्वेदिक क्लिनिकचे संचालक डॉ. शंतनू सरोदे यांचा मुलगा), ओझल संदीप पाटील ( शिक्षक संदीप पाटील यांची मुलगी), आदिती सोपान खडसे (दंतरोग तज्ञ डॉ. सोपान खडसे यांची मुलगी) यांच्यासह इतर प्रवाशांना घेऊन भुसावळकडे निघाली.

पिंपरुड फाटा ते आमोदा दरम्यान समोरून लाकडे घेऊन येणाऱ्या मालवाहू अॅपेरिक्षाने (क्र.एमएच.१९-७०६४) ने त्यांना धडक दिली. या अपघातात आदिती खडसे या विद्यार्थिनीचा घटनास्थळीच मृत्यू झाला. तर ओझल संदीप पाटील, साथ सरोदे, प्रवासी रिक्षाचालक प्रभाकर ओतारी (वय २९, रा. सावदा) हे जखमी झाले.

Leave A Reply

Your email address will not be published.