तळवेलजवळ एसटी बसची दुचाकीला धडक; एकाचा जागीच मृत्यू

वरणगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क

भुसावळ तालुक्यातील आशिया महामार्गावरील तळवेल फाट्या जवळ एसटी बस व मोटर सायकलमध्ये झालेल्या अपघातात एक जागीच ठार झाल्याची घटना शुक्रवार दि २९ रोजी ८ वाजेच्या सुमार घडली.

तालुक्यातील पिंपळगाव बु ॥ येथील मुळ रहिवाशी व हल्ली चंद्रपुर जिल्हयातील नंदूरी येथे कामानिमित्त वास्तव्यास असलेले प्रल्हाद लक्ष्मण झोपे (वय ४२) हे अक्षय तृतीया निर्माताने गावी पिंपळगाव येथे आले आले होते. दि २९ शुक्रवार रोजी ते आयुध निर्माणीच्या वसाहतील बाजारात गेले होते. बाजार घेऊन आशिया माहामार्गाकडील आयुध निर्माणीच्या प्रवेशद्वारामार्गे घरी परत पिंपळगावकडे मोटर सायकल क्र. एम एच १९ ए जी ३७८३ ने जात असताना भाग्यलक्ष्मी लॉन जवळ मुक्ताईनगर कडून येणारी एसटी बस क्र एम एच २० बी एल २४ १४ ने जोरदार धडक दिल्याने मोटर सायकलस्वार जागीच ठार झाला.

याबाबत वरणगाव पोलीस स्टेशनला मयताचे भाऊ प्रशांत झोपे यांच्या फिर्यादीनुसार एसटी चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असुन घटनेचा तपास पोहेकॉ मनोहर पाटील व प्रशांत ठाकूर हे करीत आहे.

तळवेल, दर्यापूरला समतार रस्त्यासह पुलाची मागणी

राष्ट्रीय महामार्ग नव्याने तयार होत असल्या पासुन दर्यापूर व तळवेला जोडण्यासाठी उड्डाणपुलाची व शेतकऱ्यांसाठी समांतर रस्त्याची मागणी दोन्ही गावातील ग्रामपंचायतमध्ये ठराव पारीत करून लोकप्रतिनिधीकडे मागणी केली आहे. मात्र याकडे दुर्लक्ष केले जात असल्याने या गावांना जाण्यासाठी महामार्ग ओलांडून जावे लागत असल्याने वांरवार याच ठिकाणी लहान मोठे अपघात होत असतात. नाहीतर एक ते दिड किमी अंतरावरील आयुध निर्माणीच्या प्रवेशद्वारा समोरील रस्ता ओलांडून यावे लागते. दरम्यान आमदार, खासदार यांना निवेदन देऊनही मागणी मंजूर होत नसल्याने नागरिकात संताप व्यक्त केला जात आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here