Thursday, May 26, 2022

अवजड वाहनाने दुचाकीला उडविले; दोघांचा मृत्यू

spot_imgspot_img
- Advertisement -
- Advertisement -

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क

- Advertisement -

भरधाव वेगाने धावणार्‍या अवजड वाहनाने राष्ट्रीय महामार्गावर दुचाकीला उडविल्याने दोघांचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे.

- Advertisement -

राष्ट्रीय महामार्गावरील नशिराबाद नजीकच्या माऊली पेट्रोल पंपाजवळ काल सायंकाळी साडेपाचच्या सुमारास एमएच ०६ बीई १७६९ या वाहनाने एमएच १९ एएक्स २४६० या क्रमांकाच्या दुचाकीला उडविले. या अपघातात भूषण रमेश पाटील ( वय ४२, रा. फैजपूर, ता. यावल) हे जागीच ठार झाले. तर गंभीर जखमी झालेले संजय मधुकर भिरूड ( वय ४५, रा. मस्कावद, ता. रावेर) यांना रूग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र त्यांच्यासुद्धा उपचारादरम्यान मृत्यू झाला.

भूषण पाटील आणि संजय भिरूड हे दोघे जण आरोग्य सेवक म्हणून कार्यरत होते. जळगाव येथील काम आटोपून घरी जात असतांनाच त्यांचा अपघाती मृत्यू झाला. याप्रकरणी नशिराबाद पोलीस स्थानकात नोंद करण्याचे काम सुरू होते.

 

- Advertisement -
spot_imgspot_img

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

हे वाचायलाच हवे

संबंधित बातम्या