Tuesday, May 24, 2022

रस्ता ओलांडतांना वाहनाच्या धडकेत एकाचा जागीच मृत्यू

spot_imgspot_img
- Advertisement -
- Advertisement -

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क

- Advertisement -

रस्ता ओलांडत असतांना नशिराबाद येथे अज्ञात वाहनाच्या धडकेत ५५ वर्षीय व्यक्तीचा जागीच मृत्यू झाल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी नशिराबाद पोलीस ठाण्यात अज्ञात वाहनचालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

- Advertisement -

जगन्नाथ रघुनाथ मिस्‍तरी (वय ५५, रा. खालची अळी, नशिराबाद ता. जि. जळगाव) हे मंगळवार १२ एप्रिल रोजी दुपारी १ वाजेच्या सुमारास नशिराबाद येथील बसस्थानकाजवळून राष्ट्रीय महामार्ग ओलांडत असतांना भरधाव वेगाने येणाऱ्या अज्ञात वाहनाने त्यांना जोरदार धडक दिली. या अपघातात त्यांचा जागीच मृत्यू झाला.

यावेळी अज्ञात वाहनधारक वाहन घेऊन पसार झाला होता. याप्रकरणी सुधाकर रामदास जाधव यांच्या फिर्यादीवरून नशिराबाद पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस हेडकॉन्स्टेबल अतुल महाजन करीत आहे.

- Advertisement -
spot_imgspot_img

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

हे वाचायलाच हवे

संबंधित बातम्या