बोहर्डी जवळ अपघात; दोघे ठार…

0

 

वरणगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क;

राष्ट्रीय महामार्गावरील बोहर्डी गावाजवळील नागराणी पेट्रोल पंपा समोर मालट्रक व कार मध्ये झालेल्या भीषण अपघातात कारमधील दोघ जागीच ठार झाल्याची घटना रविवारी रात्री ११ वाजेच्या सुमारास घडली आहे.

सविस्तर वृत असे की, भुसावळ तालुक्यातील राष्ट्रीय महामार्गावरील बोहर्डी गावाजवळ असलेल्या नागरणी पेट्रोल पंपासमोर मालट्रक क्र. जी जे १३ ए.टी ८५४३ विरूद्ध दिशेने येत असताना व वरणगाव कडून मुक्ताईनगर कडे जाणारी कार क्र. एम एच ४६ ए एल ६९४o यांच्यात समोरासमोर धडक झाल्याने कार मधील विशाल शिवाजी मोरे ( २६ ) व प्रतिमा रामप्रसाद पवार (३५ ) दोघे रा चिखली जि बुलढाणा हे गंभीर जखमी झाल्याने त्यांना तात्काळ जळगाव येथील सामान्य रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. मात्र रुग्णालयात येण्यापुर्वीच त्यांचा मृत्यू झाला होता. तर त्यांच्या सोबत असलेला एक व्यक्ती जखमी असुन, त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या बाबत वरणगाव पोलीस स्टेशनला या अपघाताच्या गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.