दुचाकीच्या धडकेत सात वर्षीय बालक गंभीर जखमी
जळगाव: प्रतिनिधी – जळगाव शहरातील पायघन हॉस्पिटलसमोरील रस्त्यावर भरधाव वेगाने जाणाऱ्या अज्ञात दुचाकीस्वाराने एका सात वर्षीय बालकाला जोरदार धडक दिल्याची घटना १६ मार्च रोजी रात्री १० वाजेच्या सुमारास घडली आहे. हा प्रकार नजीकच्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे. याप्रकरणी १८ मार्च रोजी एमआयडीसी पोलीस ठाण्यात अज्ञात वाहन चालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
जळगाव शहरातील कंजरवाडा परिसरातील पायघन हॉस्पिटल समोर सार्थक कपिल बागडे (वय-७) हा बालकबालक वास्तव्याला आहे. १६ मार्च रोजी रात्री १० वाजेच्या सुमारास तो रस्बालकता ओलांडत असताना भरधाव वेगाने येणाऱ्या एका अज्ञात दुचाकीस्वाराने त्याला जोरदार धडक दिली. या धडकेत सार्थक गंभीर जखमी झाला. त्याला तातडीने जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले.
या अपघाताची संपूर्ण घटना नजीकच्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. याप्रकरणी सार्थकचे वडील कपील बागडे यांनी एमआयडीसी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार अज्ञात दुचाकीस्वारावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या घटनेचा अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक मोहन पाटील हे करत आहेत.