ऐन नारळी पौर्णिमेला समुद्रात दुर्घटना

बोट उलटून तिघांचा बुडाल्याने मृत्यू

0

 

सिंधुदुर्ग

आज राज्यभरात मोठ्या उत्साहात आणि आनंदात नारळी पौर्णिमा आणि रक्षाबंधन सण साजरा केला जात असताना अचानक सिंधुदुर्गमध्ये नारळी पौर्णिमा सणाला गालबोट लागल्याची घटना घडली. मालवणमध्ये मासेमारी बोट बुडून ३ जणांचा मृत्यू झाला असून तिघांचे मृतदेह हाती आले आहेत. मयत सर्व खलाशी आचराचे असल्या सांगण्यात आले आहे.

 

मिळालेल्या माहितीनुसार, आचरा येथील चार खलाशी मासेमारीसाठी रविवारी रात्री सर्जेकोट समुद्रात गेले होते. समुद्रामध्ये निर्माण झालेल्या धुक्यांमुळे बोट दगडाला आपटली. त्यानंतर ही बोट समुद्रात पलटी झाली आणि बोटीवरील चारही खलाशी समुद्रात बुडाले. यामधील ३ खालाश्यांचा समुद्रात बुडून मृत्यू झाला.

 

या खलाशांपैकी एक खलाशी पोहत पोहत समुद्रकिनारी पोहचला. त्याने घडलेल्या घटनेची माहिती दिली. त्यानंतर समुद्रात बुडालेल्या तिन्ही खलाशांचा शोध घेण्यात आला. या तिन्ही खलाशांचे मृतेदह सापडले असून शवविच्छेदनासाठी रुग्णालयामध्ये पाठवण्यात आले आहेत. रुग्णालयाबाहेर खलाश्यांच्या नातेवाईकांनी मोठी गर्दी केली आहे.

 

या दुर्घटनेमध्ये सर्जेकोट सोसायटीचे चेअरमन गंगाराम आडकर यांचा मृत्यू झाला. अपघातग्रस्त बोट गंगाराम आडकर यांचीच होती. आडकर हे चौके विद्यालयातून सेवानिवृत्त झाले होते. या घटनेमुळे आडकर कुटुंबीयांना मोठा धक्का बसला असून नारळी पौर्णिमेच्या दिवशी सर्जेकोट गावावर शोककळा परसरली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.