लोकशाही न्युज नेटवर्क
पाचोरा ते वरखेडी रस्त्यावरील स्वप्नशिल्प मंगल कार्यालयाजवळ १९ फेब्रुवारी रोजी रात्रीच्या सुमारास सी. आर. पी. एफ. जवान प्रदीपकुमार राजाराम पाटील रा. राजीव गांधी काॅलनी, पाचोरा यांचा अपघात झाला होता. या अपघातात त्यांचे डोक्याला गंभीर दुखापत झाली असल्याने त्यांचेवर जळगाव येथील खाजगी रुग्णालयात उपचार सुरू होते.

रुग्णालयात मेंदुची शस्त्रक्रिया करण्यात आली होती. मात्र मेंदुत अती रक्तस्राव झाल्याने २२ फेब्रुवारी रोजी रात्री ९:४५ वाजता जवान प्रदिपकुमार पाटील यांची मृत्यूशी सुरू असलेली झुंज संपली व त्यांचे निधन झाले. प्रदिपकुमार राजाराम पाटील हे २१९ बी. एन. सी. आर. पी. एफ. सुकना (छत्तीसगड) येथे देशसेवा देत होते. त्यांचे वर २३ फेब्रुवारी रोजी दुपारी २ वाजता शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले.

