Close Menu
लोकशाहीलोकशाही
    Facebook X (Twitter) Instagram
    Trending
    • रावेर शहरात कोट्यवधींच्या विकासकामांची नांदी
    • गोकुळच्या सत्तासंघर्षाचा वाद आता रस्त्यावर उतरला
    • दिवाळी पाडवा आणि भाऊबीज : नात्यातील जिव्हाळ्याचा दीपोत्सव
    • ठाकरेंची साथ सोडण्याच्या निर्णयाबाबत निंबाळकरांचे मोठे विधान
    • 15 डिसेंबरपर्यंत शेतातील बोअरवरील बंदी उठविणार
    • कोल्हापुरात गोकुळच्या माजी संचालकांना शिवीगाळ
    • अमेरिकेत ऐन दिवाळी समारंभात गोंधळ
    • दिवाळी : दंतकथांमागील शहाणपण
    Facebook X (Twitter) Instagram
    लोकशाहीलोकशाही
    Demo
    • होम
    • राष्ट्रीय
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
    • जळगाव
      • जळगाव जिल्हा
    • राजकारण
    • गुन्हे वार्ता
      • अपघात
    • संपादकीय
      • लोकशाही विशेष
    • व्हिडीओ
    • ई-पेपर
    • आणखी
      • स्किन केअर
      • हवामान
      • कृषी
      • नोकरी संदर्भ
      • आरोग्य
      • शैक्षणिक
      • खाद्य संस्कृती
      • राशी भविष्य
      • अध्यात्म
      • लोकार्थ
      • पॉडकास्ट
    लोकशाहीलोकशाही
    Home»ताज्या बातम्या»नशिराबादजवळ दुचाकी–ट्रॅव्हल्सची भीषण धडक ; तरुणाचा मृत्यू
    ताज्या बातम्या

    नशिराबादजवळ दुचाकी–ट्रॅव्हल्सची भीषण धडक ; तरुणाचा मृत्यू

    Team Lokshahi LiveBy Team Lokshahi LiveDecember 17, 2025No Comments1 Views
    Facebook Twitter Pinterest LinkedIn WhatsApp Reddit Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    नशिराबादजवळ दुचाकी–ट्रॅव्हल्सची भीषण धडक ; तरुणाचा मृत्यू

    नशिराबाद प्रतिनिधी नशिराबादजवळील सावन हॉटेलसमोर आज मंगळवार, दि. १६ रोजी सकाळी सुमारे दहा वाजेच्या सुमारास दुचाकी आणि खासगी ट्रॅव्हल्स यांच्यात झालेल्या भीषण अपघातात दुचाकीस्वार तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना घडली. या अपघातामुळे काही काळ परिसरात वाहतूक कोंडी निर्माण झाली होती.

    पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अंकुश गोकुळ चव्हाण (वय २२, रा. मीठापुर, ता. बऱ्हाणपूर, जि. बऱ्हाणपूर – मध्य प्रदेश) हा तरुण सध्या कामानिमित्त जळगाव तालुक्यातील रायपूर–कुसुंबा येथे आपल्या आतेभावाकडे वास्तव्यास होता. आज सकाळी तो दुचाकी (एमएच-१९ ईएल-४४६०) ने जळगावकडून नशिराबादच्या दिशेने सर्व्हिस रोडने जात होता.

    दरम्यान, सावन हॉटेलजवळ सर्व्हिस रोडवरून मुख्य रस्त्यावर दुचाकी घेत असताना भुसावळहून जळगावकडे जाणारी एम.एस.टी. खासगी कंपनीची ट्रॅव्हल्स (एमपी-६९ पी-०१८५) समोर आल्याने दोन्ही वाहनांमध्ये जोरदार धडक झाली. धडक इतकी तीव्र होती की दुचाकी ट्रॅव्हल्सच्या समोरील भागाखाली अडकली. यामध्ये अंकुश चव्हाण गंभीर जखमी झाला.

    अपघाताची माहिती मिळताच नागरिकांनी घटनास्थळी गर्दी केली. जखमी अंकुश याला तातडीने उपचारासाठी जळगाव येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले; मात्र डॉक्टरांनी तपासणीनंतर त्याला मृत घोषित केले. या अपघातात भुसावळकडून जळगावकडे येणारी एक कार (एमएच-२८ बीक्यू-६४५५) नियंत्रण सुटून रस्त्याच्या कडेला जाऊन थांबली. या कारचे चालक आदित्य प्रकाश लोखंडे यांना किरकोळ दुखापत झाली असून, त्यांच्यावर प्राथमिक उपचार करण्यात आले.

    दरम्यान, संबंधित ट्रॅव्हल्समध्ये दोन प्रवासी प्रवास करत असल्याची माहिती असून, ते सुखरूप असल्याचे समजते. घटनेची नोंद नशिराबाद पोलीस ठाण्यात करण्यात येत असून, पुढील तपास सुरू आहे.

    https://lokshahilive.com/wp-content/uploads/2026/09/WhatsApp-Video-2026-09-16-at-10.29.50-PM.mp4

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Telegram Email
    Team Lokshahi Live
    • Website

    Related Posts

    शरद पवार यांना ब्रीच कँडी रुग्णालयातून डिस्चार्ज

    November 7, 2026

    पारंपरिक चवीला आधुनिक साज देणाऱ्या हटके रेसिपीज

    November 3, 2026

    जळगावमध्ये अवैध धंद्यांचे जाळे फोफावले; जुगार अड्ड्यावर गोळीबाराच्या चर्चेने खळबळ!

    November 3, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Lokshahi Live. Designed by ContentOcean Infotech.
    • Contact Us
    • About us

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

    whatsapp-Gif