भरधाव दुचाकीची समोरून धडक; महिला गंभीर जखमी

0

भरधाव दुचाकीची समोरून धडक; महिला गंभीर जखमी

जळगाव :- भरधाव वेगात दुचाकी चालवताना रस्त्याच्या परिस्थितीकडे दुर्लक्ष केल्याने समोरून येणाऱ्या दुचाकीला जोरदार धडक बसून एक महिला गंभीर जखमी झाल्याची घटना १९ एप्रिल रोजी दुपारी कानळदा रोडवरील फुपनगरी फाट्यानजीक घडली. या प्रकरणी संबंधित दुचाकीस्वाराविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

कोकीळा लालचंद सोनवणे (वय ५५, रा. कानळदा) या दुपारी साडेबारा वाजता दुचाकीवरून जात असताना (क्र. MH 19 EB 6906) ही दुचाकी चालवणाऱ्या तोहीद अली याकुब अली सय्यद (रा. चोपडा) या तरुणाने समोरून येणाऱ्या त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली.

या अपघातात कोकीळा सोनवणे यांच्या हाताला व डोक्याला गंभीर दुखापत झाली असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. अपघातानंतर त्यांनी तालुका पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली असून, तोहीद अली याच्याविरुद्ध गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

या प्रकरणाचा तपास महिला पोलीस नाईक मनिषा उमराणे करीत आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.