Close Menu
लोकशाहीलोकशाही
    Facebook X (Twitter) Instagram
    Trending
    • इमारतीतील रहिवाशांसाठी दिवाळीची ठरली काळ रात्र
    • शहरे गुदमरली; नागरिकांचा श्वास कोंडला!
    • एक्सप्रेसवेवर बस ४० फूट खोल कोसळली; ३ जणांचा मृत्यू
    • गोळीबारातील ‘त्या’ जखमी तरुणाचा मृत्यू
    • रावेर शहरात कोट्यवधींच्या विकासकामांची नांदी
    • गोकुळच्या सत्तासंघर्षाचा वाद आता रस्त्यावर उतरला
    • दिवाळी पाडवा आणि भाऊबीज : नात्यातील जिव्हाळ्याचा दीपोत्सव
    • ठाकरेंची साथ सोडण्याच्या निर्णयाबाबत निंबाळकरांचे मोठे विधान
    Facebook X (Twitter) Instagram
    लोकशाहीलोकशाही
    Demo
    • होम
    • राष्ट्रीय
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
    • जळगाव
      • जळगाव जिल्हा
    • राजकारण
    • गुन्हे वार्ता
      • अपघात
    • संपादकीय
      • लोकशाही विशेष
    • व्हिडीओ
    • ई-पेपर
    • आणखी
      • स्किन केअर
      • हवामान
      • कृषी
      • नोकरी संदर्भ
      • आरोग्य
      • शैक्षणिक
      • खाद्य संस्कृती
      • राशी भविष्य
      • अध्यात्म
      • लोकार्थ
      • पॉडकास्ट
    लोकशाहीलोकशाही
    Home»गुन्हे वार्ता»लाच घेतली १० हजाराची; मालमत्ता आढळली ५ कोटीची
    गुन्हे वार्ता

    लाच घेतली १० हजाराची; मालमत्ता आढळली ५ कोटीची

    जिल्हा परिषदच्या लाचखोर अधिकाऱ्याच्या घरात सापडलं घबाड
    Team Lokshahi LiveBy Team Lokshahi LiveNovember 5, 2026No Comments521 Views
    Facebook Twitter Pinterest LinkedIn WhatsApp Reddit Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

     

    लोकशाही न्यूज नेटवर्क

    जळगावमध्ये १० हजारांची लाच घेताना पकडलेल्या जिल्हा परिषद अधिकाऱ्याच्या घरात आणि बँक लॉकरमध्ये ५ कोटी १६ लाखांची मालमत्ता आढळली. एसीबीला सोने, चांदी, प्लॅटिनमचे दागिने आणि रोकड मिळाली असून उत्पन्नाच्या स्रोतांची तपासणी आता सुरू होणार आहे.

    जळगावमध्ये लाच घेताना रंगेहात पकडलेल्या जिल्हा परिषद अधिकाऱ्याच्या घरात आणि बँक लॉकरमध्ये लाचलुचपत प्रतिबंधक विभागाला (एसीबी) मोठं घबाड सापडलंय. जिल्हा परिषद बांधकाम विभागाचे उपविभागीय अधिकारी (वर्ग १) सतीश मन्सुलाल शिसोदे यांच्याकडे तब्बल ५ कोटी १६ लाख ८८ हजार ३८९ रुपयांची मालमत्ता आढळली आहे. यामध्ये २ हजार ५२४ ग्रॅम सोने, ११ हजार ६३३ ग्रॅम चांदी आणि प्लॅटिनमच्या दागिन्यांचा समावेश आहे.

    शिसोदे यांना २ नोव्हेंबर रोजी १० हजार रुपयांची लाच घेताना एसीबीने रंगेहात पकडलं होतं. त्यानंतर त्यांच्या घराची आणि बँक लॉकरची झडती घेण्यात आली. या झडतीत आदर्श नगरमधील दोन घरांची किंमत अनुक्रमे ४५ लाख आणि ६५ लाख रुपये असल्याचं समोर आलं. घरातून ७ लाख ९७ हजार ९२० रुपये रोख आणि २४ लाख ३९ रुपयांच्या इतर वस्तू मिळाल्या. घरझडतीत सापडलेल्या मालमत्तेची एकूण किंमत १ कोटी ४१ लाख ९७ हजार ९५९ रुपये आहे.

    बँक लॉकरमध्ये ३ कोटी ७४ लाख ९० हजार ४३० रुपयांचे दागिने आढळले. यात २ हजार ५२४.१८ ग्रॅम सोन्याची बिस्किटं, पट्ट्या, चेन, पेंडंट, लॉकेट आणि बांगड्यांचा समावेश आहे. तसंच ११ हजार ६३३.७ ग्रॅम चांदीच्या वस्तू आणि दागिने, तर १०१.०२ वजनाचे प्लॅटिनमचे दागिनेही मिळाले.

    या प्रकरणी जिल्हापेठ पोलीस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्याच्या कलम ७ आणि १२ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून शिसोदे यांना अटक करण्यात आली आहे. शिसोदे यांच्याकडे एवढी मालमत्ता कुठून आली, याचा तपास एसीबी करणार आहे. त्यांचं वेतन, ज्ञात उत्पन्न, बँक व्यवहार, गुंतवणूक आणि मालमत्तेची तुलना केली जाणार आहे. तसंच बांधकाम विभागातील कंत्राटे आणि आर्थिक व्यवहारांचीही तपासणी होऊ शकते.

    https://lokshahilive.com/wp-content/uploads/2026/09/WhatsApp-Video-2026-09-16-at-10.29.50-PM.mp4

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Telegram Email
    Team Lokshahi Live
    • Website

    Related Posts

    गोळीबारातील ‘त्या’ जखमी तरुणाचा मृत्यू

    November 9, 2026

    रावेर शहरात कोट्यवधींच्या विकासकामांची नांदी

    November 9, 2026

    कोल्हापुरात गोकुळच्या माजी संचालकांना शिवीगाळ

    November 8, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Lokshahi Live. Designed by ContentOcean Infotech.
    • Contact Us
    • About us

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

    whatsapp-Gif