वर्क ऑर्डर काढण्यासाठी मागितली दीड हजाराची लाच !
धरणगाव पंचायत समितीतील सहाय्यक कार्यक्रम अधिकारी जाळ्यात
वर्क ऑर्डर काढण्यासाठी मागितली दीड हजाराची लाच !
धरणगाव पंचायत समितीतील सहाय्यक कार्यक्रम अधिकारी जाळ्यात
जळगाव;- धरणगाव पंचायत समितीतील सहाय्यक कार्यक्रम अधिकाऱ्याला वर्क ऑर्डर काढण्यासाठी दिड हजारांची लाच घेताना जळगाव एसीबीने अटक केली. ही कारवाई शुक्रवारी दुपारी पावणेतीन वाजेच्या सुमारास करण्यात आली. अटक करण्यात आलेल्या अधिकाऱ्याचे नाव प्रवीण चौधरी आहे.
तक्रारदाराला वर्क ऑर्डर देण्यासाठी प्रवीण चौधरी यांनी दिड हजार रुपयांची लाच मागितली. तक्रारदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दाखल केली. त्यानंतर पडताळणी करून सापळा रचण्यात आला.
शुक्रवारी दुपारी पावणेतीन वाजता कार्यालयातच प्रवीण चौधरी यांनी लाच स्वीकारताच त्यांना अटक करण्यात आली. जळगाव एसीबीचे पोलीस उपअधीक्षक योगेश ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली पोलीस निरीक्षक स्मिता नवघरे व त्यांच्या सहकाऱ्यांनी ही कारवाई यशस्वीपणे पार पाडली.