
लोकशाही न्यूज नेटवर्क
पुणे महापालिकेतील ‘टक्केवारी’च्या चर्चांनी पुन्हा एकदा जोर धरला आहे. यावेळी वाद थेट सत्ताधारी भाजपच्या गोटातच पेटल्याचे पाहायला मिळाले. पुणे महापालिकेमध्ये टक्केवारीवर भाजपाच्या आजी माजी नगरसेवकांमध्ये जोरदार झाला. बाणेर येथील आदिवासी विद्यार्थिनींसाठी उभारण्यात येणाऱ्या निवासी शिक्षण केंद्राच्या कामावरून विद्यमान आणि माजी नगरसेविकांमध्ये महापालिकेतच जोरदार वाद झाला.
दरम्यान एकमेकांना शिवीगाळदेखील केली. विद्यमान नगरसेविका रोहिणी चिंते आणि माजी नगरसेविका राजश्री काळे यांच्यात महापालिका भगवत शिवीगाळ आणि वादावादी झाली. तीन कोटींच्या टेंडरमधील टक्केवारीसाठी काम रोखल्याचा आरोप काळे यांनी केला तर चिमटे यांनी हे आरोप फेटाळले आहेत. पुणे महानगरपालिकेत भांडणाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

