Close Menu
लोकशाहीलोकशाही
    Facebook X (Twitter) Instagram
    Trending
    • ज्ञानेश कुमार हटाव! जळगावात आंदोलन!
    • नाथाभाऊंच्या फार्म हाऊसवर ड्रोनच्या घिरट्या; चेष्टेचा विषय?
    • जेना नाल्यातून रेतीचा खेळ; पोलिसांची धडक कारवाई!
    • अनाधिकृत फटाक्यांच्या गोडाऊनमध्ये भीषण अपघात
    • वरणगाव क्रीडांगणाचा प्रस्ताव केंद्रीय क्रीडा मंत्री रक्षा खडसेंना सुपूर्द
    • दुचाकी व ओमनीच्या अपघातात तरुणासह महिला गंभीर जखमी
    • बोगस दिव्यांग प्रमाणपत्राद्वारे लाटल्या नोकऱ्या!
    • प्रेमसंबंधाचा विरोध ठरला जीवघेणा!
    Facebook X (Twitter) Instagram
    लोकशाहीलोकशाही
    Demo
    • होम
    • राष्ट्रीय
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
    • जळगाव
      • जळगाव जिल्हा
    • राजकारण
    • गुन्हे वार्ता
      • अपघात
    • संपादकीय
      • लोकशाही विशेष
    • व्हिडीओ
    • ई-पेपर
    • आणखी
      • हवामान
      • कृषी
      • नोकरी संदर्भ
      • आरोग्य
      • शैक्षणिक
      • खाद्य संस्कृती
      • राशी भविष्य
      • अध्यात्म
      • लोकार्थ
      • पॉडकास्ट
    लोकशाहीलोकशाही
    Home»गुन्हे वार्ता»खुनाचा प्रयत्न करणाऱ्या ठाणे जिल्ह्यातील फरार आरोपीस अटक
    गुन्हे वार्ता

    खुनाचा प्रयत्न करणाऱ्या ठाणे जिल्ह्यातील फरार आरोपीस अटक

    Team Lokshahi LiveBy Team Lokshahi LiveSeptember 8, 2026No Comments135 Views
    Facebook Twitter Pinterest LinkedIn WhatsApp Reddit Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

     

    पाचोरा

    पाचोरा पोलीस ठाण्याच्या गुन्हे शोध पथकाने खुनाचा प्रयत्न केल्याप्रकरणी ठाणे ग्रामीण जिल्ह्यातील किन्हवली पोलीस ठाण्यात दाखल गुन्ह्यात फरार असलेल्या आरोपीस पाचोरा शहरातून ताब्यात घेतले. ही कारवाई दि. ७ सप्टेंबर रोजी करण्यात आली.

    पोलीस अधीक्षकांच्या आदेशान्वये पाचोरा शहरात चोरी व मालमत्तेच्या गुन्ह्यातील आरोपींचा शोध घेण्यासाठी पोलीस उपनिरीक्षक कृष्णा घायाळ, पोलीस हेड कॉन्स्टेबल राहुल शिंपी, पोलीस हेड कॉन्स्टेबल गजानन देशमुख, पोलीस कॉन्स्टेबल शरद पाटील व पोलीस कॉन्स्टेबल श्रीराम शिंपी हे पथक रवाना झाले होते. यावेळी पोलीस हेड कॉन्स्टेबल राहुल शिंपी यांना त्यांच्या गुप्त बातमीदारामार्फत किन्हवली पोलीस ठाणे, जिल्हा ठाणे ग्रामीण येथील गुन्ह्यातील संशयित आरोपी प्रितम नवनीत पाटील हा गुन्हा घडल्यापासून फरार असून सध्या पाचोरा येथे असल्याची माहिती मिळाली.

    ही माहिती पोलीस निरीक्षक राहुलकुमार पवार यांना देण्यात आल्यानंतर त्यांनी कायदेशीर कारवाई करण्याचे आदेश दिले. त्यानुसार पथकाने संशयित आरोपीच्या मोबाइल क्रमांकाचे लोकेशन ट्रेस केले असता ते पाचोरा येथील भाजीमंडी परिसरात आढळून आले. पथकाने भाजीमंडी येथे जाऊन पाहणी केली असता एक संशयित इसम भाजीपाला घेताना दिसून आला. त्यास संशयावरून सायंकाळी ६.३० वाजता ताब्यात घेण्यात आले.

    पोलिसांनी आपली ओळख सांगून नाव व गाव विचारले असता त्याने आपले नाव प्रितम नवनीत पाटील (वय २५ वर्षे), रा. फ्लॅट क्रमांक २०, अवध अॅनेक्स, समर्थ नगर, पाथर्डी फाटा, ता. जि. नाशिक, असे सांगितले. त्यानंतर त्याला गुन्ह्याची हकिगत सांगण्यात आली. पोलिसांच्या माहितीनुसार, त्याने सदर गुन्हा केल्याची कबुली दिली.

    त्यानंतर पोलीस निरीक्षक राहुलकुमार पवार यांच्या आदेशानुसार संशयित आरोपीस पाचोरा पोलीस ठाण्यात आणण्यात आले. याबाबत किन्हवली पोलीस ठाणे, जिल्हा ठाणे ग्रामीण यांना माहिती देण्यात आली. त्यानंतर किन्हवली पोलीस ठाण्याचे पथक पाचोरा येथे दाखल झाले असून आरोपी प्रितम नवनीत पाटील यास त्यांच्या ताब्यात देण्यात आले.

    ही कारवाई पोलीस अधीक्षक श्रीकांत ढिवरे, अपर पोलीस अधीक्षक अशोक नखाते व उपविभागीय पोलीस अधिकारी बापू रोहम यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक राहुलकुमार पवार, पोलीस उपनिरीक्षक कृष्णा घायाळ, पोलीस हेड कॉन्स्टेबल राहुल शिंपी, पोलीस हेड कॉन्स्टेबल गजानन देशमुख, पोलीस कॉन्स्टेबल शरद पाटील व पोलीस कॉन्स्टेबल श्रीराम शिंपी यांनी पार पाडली.

    https://lokshahilive.com/wp-content/uploads/2026/09/WhatsApp-Video-2026-09-16-at-10.29.50-PM.mp4

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Telegram Email
    Team Lokshahi Live
    • Website

    Related Posts

    जेना नाल्यातून रेतीचा खेळ; पोलिसांची धडक कारवाई!

    October 6, 2026

    वरणगाव क्रीडांगणाचा प्रस्ताव केंद्रीय क्रीडा मंत्री रक्षा खडसेंना सुपूर्द

    October 6, 2026

    दुचाकी व ओमनीच्या अपघातात तरुणासह महिला गंभीर जखमी

    October 6, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Lokshahi Live. Designed by ContentOcean Infotech.
    • Contact Us
    • About us

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

    whatsapp-Gif