Close Menu
लोकशाही लोकशाही
    Facebook X (Twitter) Instagram
    Trending
    • ओझरखेडा तलावामध्ये हतनूर धरणाचे पाणी!
    • TET पेपरफुटी : सोलापुरातून प्रशिक्षण केंद्र चालकाला अटक
    • मंत्रिमंडळ बैठकीत ७ महत्त्वाचे निर्णय
    • वेल्हाळे कपिलेश्वर महादेव मंदिरात १७ ऑगस्टला मुकुट सोहळा
    • राजस्थानमधील व्यापाऱ्याकडून सात लाखांची फसवणूक
    • पुन्हा मुख्यमंत्र्यांच्या हेलिकॉप्टरमध्ये तांत्रिक बिघाड
    • खिडकीतून मण्यार आता घुसला अन् होत्याचे नव्हते!
    • भर पावसातली महाबळेश्वर पिकनिक थेट जीवावर बेतली
    Facebook X (Twitter) Instagram
    लोकशाही लोकशाही
    Demo
    • होम
    • राष्ट्रीय
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
    • जळगाव
      • जळगाव जिल्हा
    • राजकारण
    • गुन्हे वार्ता
      • अपघात
    • संपादकीय
      • लोकशाही विशेष
    • व्हिडीओ
    • ई-पेपर
    • आणखी
      • हवामान
      • कृषी
      • नोकरी संदर्भ
      • आरोग्य
      • शैक्षणिक
      • खाद्य संस्कृती
      • राशी भविष्य
      • अध्यात्म
      • लोकार्थ
      • पॉडकास्ट
    लोकशाही लोकशाही
    Home»अपघात»सुबाभुळची सुमारे २४० झाडे आगीत जळून खाक
    अपघात

    सुबाभुळची सुमारे २४० झाडे आगीत जळून खाक

    २ लाखाचे नुकसान : खडकदेवळा शिवारातील घटना
    Team Lokshahi LiveBy Team Lokshahi LiveJune 19, 2026No Comments105 Views
    Facebook Twitter Pinterest LinkedIn WhatsApp Reddit Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

     

    पाचोरा, लोकशाही न्यूज नेटवर्क

    पाचोरा तालुक्यातील खडकदेवळा शिवारात लागलेल्या आगीत शेतातील सुबाभूळची सुमारे २४० झाडे जळून खाक झाल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी पाचोरा पोलीस ठाण्यात आकस्मिक आगीची नोंद करण्यात आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, खडकदेवळा येथे शांताबाई ब्राम्हणे यांचे गट क्रमांक २८९ / २ मधील शेतात १६ जून रोजी दुपारी ३ ते ४ वाजेच्या सुमारास आग लागली. या आगीत सुमारे सात वर्षे वयाची सुबाभुळची २४० झाडे पूर्णपणे जळून नष्ट झाली.

    या नुकसानीची अंदाजित किंमत सुमारे २ लाख रुपये असल्याचे नमूद करण्यात आले आहे. घटनेची माहिती मिळताच पाचोरा पोलीस ठाण्याचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. पंचनामा करून पुढील तपास सुरू असून आगीचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. अॅड. रविंद्र ब्राह्मणे यांच्या खबरीवरुन पाचोरा पोलिस स्टेशनमध्ये अकस्मात आगीची नोंद करण्यात आली असुन पुढील तपास पो. काॅ. कमलेश पाटील हे करीत आहे.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Telegram Email
    Team Lokshahi Live
    • Website

    Related Posts

    वेल्हाळे कपिलेश्वर महादेव मंदिरात १७ ऑगस्टला मुकुट सोहळा

    August 11, 2026

    पुन्हा मुख्यमंत्र्यांच्या हेलिकॉप्टरमध्ये तांत्रिक बिघाड

    August 11, 2026

    खिडकीतून मण्यार आता घुसला अन् होत्याचे नव्हते!

    August 11, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Lokshahi Live. Designed by ContentOcean Infotech.
    • Contact Us
    • About us

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

    whatsapp-Gif