जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क

महाराष्ट्र शासनाच्या व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण मंडळातर्फे घेण्यात आलेल्या अंतिम परीक्षांचा निकाल जाहीर झाला असून, जळगाव रेल्वे स्टेशनजवळील अभिनव टेक्निकल इन्स्टिट्यूटने यंदाही घवघवीत यश संपादन केले आहे. संस्थेच्या इलेक्ट्रिशियन अभ्यासक्रमाचा १०० टक्के, हेल्थ सॅनिटरी इन्स्पेक्टर अभ्यासक्रमाचा ९८ टक्के, तर कन्स्ट्रक्शन सुपरवायझर अभ्यासक्रमाचा ९५ टक्के निकाल लागला आहे.
इलेक्ट्रिशियन या दोन वर्षांच्या अभ्यासक्रमात उमा सुनील पाटील हिने ८६.८९ टक्के गुण मिळवत प्रथम क्रमांक पटकावला. स्वाती प्रदीप जाधव आणि दीपली रवींद्र साळुंके यांनी प्रत्येकी ८३.६७ टक्के गुण मिळवत द्वितीय क्रमांक मिळवला. दीपक मधुकर लांडगे याने ८२ टक्के गुणांसह तृतीय क्रमांक मिळवला.
हेल्थ सॅनिटरी इन्स्पेक्टर अभ्यासक्रमात हितेश रवींद्र चौधरी याने ८९.१४ टक्के गुण मिळवत प्रथम क्रमांक मिळवला. समीर कासम तडवी याने ७५ टक्के गुणांसह द्वितीय, तर अभिषेक ज्ञानेश्वर माळी याने ७४.२९ टक्के गुणांसह तृतीय क्रमांक मिळवला. कन्स्ट्रक्शन सुपरवायझर अभ्यासक्रमात अमित मधुकर काथे याने ८३.१४ टक्के गुण मिळवत प्रथम क्रमांक पटकावला. प्रियंका अशोक सपकाळे हिने ८२.५७ टक्के गुणांसह द्वितीय, तर तनुश्री विनोद पाटील हिने ८२.४३ टक्के गुणांसह तृतीय क्रमांक मिळवला.
डीएमएलटी अभ्यासक्रमात अजय संजय तेली याने ७३.११ टक्के गुण मिळवत यश संपादन केले. संस्थेतील एकूण ३५ विद्यार्थ्यांनी प्रथम श्रेणी विशेष प्राविण्यासह, तर ६२ विद्यार्थ्यांनी प्रथम श्रेणीत उत्तीर्ण होऊन उल्लेखनीय कामगिरी केली. विद्यार्थ्यांनी मेहनत, सातत्य आणि चिकाटीच्या बळावर हे यश मिळवले आहे. गुणवंत विद्यार्थ्यांचे मार्गदर्शक शिक्षक, पालक तसेच शैक्षणिक व सामाजिक क्षेत्रातील मान्यवरांकडून अभिनंदन करण्यात येत आहे.
संस्थेचे संस्थापक अध्यक्ष प्रा. पी. आर. पाटील, प्राचार्य निखिल पाटील, प्रा. विनायक काळे, प्रा. विवेकानंद सरडे, निर्देशक मनोज ओतारी, शिक्षिका सौ. संगिता जैन, कु. तेजस्विनी बाविस्कर आणि संचालिका पुष्पाताई पाटील यांनी सर्व उत्तीर्ण व गुणवंत विद्यार्थ्यांचे अभिनंदन करून त्यांच्या भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या.


