Close Menu
लोकशाही लोकशाही
    Facebook X (Twitter) Instagram
    Trending
    • ओझरखेडा तलावामध्ये हतनूर धरणाचे पाणी!
    • TET पेपरफुटी : सोलापुरातून प्रशिक्षण केंद्र चालकाला अटक
    • मंत्रिमंडळ बैठकीत ७ महत्त्वाचे निर्णय
    • वेल्हाळे कपिलेश्वर महादेव मंदिरात १७ ऑगस्टला मुकुट सोहळा
    • राजस्थानमधील व्यापाऱ्याकडून सात लाखांची फसवणूक
    • पुन्हा मुख्यमंत्र्यांच्या हेलिकॉप्टरमध्ये तांत्रिक बिघाड
    • खिडकीतून मण्यार आता घुसला अन् होत्याचे नव्हते!
    • भर पावसातली महाबळेश्वर पिकनिक थेट जीवावर बेतली
    Facebook X (Twitter) Instagram
    लोकशाही लोकशाही
    Demo
    • होम
    • राष्ट्रीय
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
    • जळगाव
      • जळगाव जिल्हा
    • राजकारण
    • गुन्हे वार्ता
      • अपघात
    • संपादकीय
      • लोकशाही विशेष
    • व्हिडीओ
    • ई-पेपर
    • आणखी
      • हवामान
      • कृषी
      • नोकरी संदर्भ
      • आरोग्य
      • शैक्षणिक
      • खाद्य संस्कृती
      • राशी भविष्य
      • अध्यात्म
      • लोकार्थ
      • पॉडकास्ट
    लोकशाही लोकशाही
    Home»महाराष्ट्र»उत्तर महाराष्ट्र»जळगाव»अभय योजनाः जळगाव जिल्ह्यात 4635 ग्राहक थकबाकीमुक्त
    जळगाव

    अभय योजनाः जळगाव जिल्ह्यात 4635 ग्राहक थकबाकीमुक्त

    Team Lokshahi LiveBy Team Lokshahi LiveMarch 12, 2025No Comments0 Views
    Facebook Twitter Pinterest LinkedIn WhatsApp Reddit Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    अभय योजनाः जळगाव जिल्ह्यात 4635 ग्राहक थकबाकीमुक्त

    जळगाव ;- 31 मार्च 2024 पर्यंत कायमस्वरूपी वीज पुरवठा खंडित झालेल्या घरगुती, व्यावसायिक, औद्योगिक व इतर थकबाकीदारांसाठी महावितरणची अभय योजना-2024 सुरु आहे. जळगाव जिल्ह्यात योजनेला भरघोस प्रतिसाद मिळत आहे. सदर योजना 31 मार्च 2025 पर्यंत सुरु आहे. योजना काळात 10 मार्च 2025 पर्यंत जळगाव जिल्ह्यातील लघुदाब व उच्चदाब श्रेणीतील 4635 ग्राहकांनी 4 कोटी 82 लाख रुपयांचा भरणा केलेला आहे. या योजनेत 1746 ग्राहकांचा त्यांच्या मागणीप्रमाणे वीजपुरवठा पूर्ववत करण्यात आला आहे.

     

    कृषी व सार्वजनिक पुरवठा योजना वर्गवारीतील ग्राहक वगळून 31 मार्च 2024 पर्यंत कायमस्वरूपी वीजपुरवठा खंडित असणाऱ्या सर्व लघुदाब आणि उच्चदाब वर्गवारीतील वीज ग्राहकांसाठी ही योजना आहे. थकबाकीमुक्त होणाऱ्या खंडित ग्राहकांना नवीन वीज जोडणीची संधी देणारी ही योजना आहे.

    योजनेनुसार संपूर्ण मुद्दल भरणाऱ्या ग्राहकांना वीज बिलातील शंभर टक्के व्याज व विलंब आकार माफ असणार आहे. महावितरणच्या या अभय योजनेमध्ये 31 मार्च 2025 पर्यंतच सहभाग घेता येणार आहे. तरी अधिकाधिक कायम स्वरुपी वीज पुरवठा खंडित असलेल्या ग्राहकांनी योजनेत सहभागी होऊन योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन मुख्य अभियंता श्री आय.ए. मुलाणी यांनी केले आहे.

     

    जागेची मालकी, ताबेदार किंवा खरेदीदार यांच्यात बदल झाला असला तरी थकबाकीदारांना वीजबिलाच्या थकबाकीची रक्कम भरणे कायद्याने बंधनकारक आहे. त्यामुळे थकबाकीदारांना थकबाकीमुक्त होण्यासाठी तसेच सदर जागेमध्ये नवीन वीज जोडणी घेण्यासाठी, ही योजना एक मोठी संधी आहे. थकीत ग्राहकांनी योजनेचा लाभ घेण्यासाठी नजीकच्या महावितरण कार्यालयाशी संपर्क साधावा. असे आवाहन महावितरणतर्फ़े करण्यात येत आहे.

    #mahavitran abhay yojna
    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Telegram Email
    Team Lokshahi Live
    • Website

    Related Posts

    वेल्हाळे कपिलेश्वर महादेव मंदिरात १७ ऑगस्टला मुकुट सोहळा

    August 11, 2026

    राजस्थानमधील व्यापाऱ्याकडून सात लाखांची फसवणूक

    August 11, 2026

    अशी तशी नव्हे; चक्क बसचीच केली चोरी!

    August 10, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Lokshahi Live. Designed by ContentOcean Infotech.
    • Contact Us
    • About us

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

    whatsapp-Gif