Close Menu
लोकशाही लोकशाही
    Facebook X (Twitter) Instagram
    Trending
    • ओझरखेडा तलावामध्ये हतनूर धरणाचे पाणी!
    • TET पेपरफुटी : सोलापुरातून प्रशिक्षण केंद्र चालकाला अटक
    • मंत्रिमंडळ बैठकीत ७ महत्त्वाचे निर्णय
    • वेल्हाळे कपिलेश्वर महादेव मंदिरात १७ ऑगस्टला मुकुट सोहळा
    • राजस्थानमधील व्यापाऱ्याकडून सात लाखांची फसवणूक
    • पुन्हा मुख्यमंत्र्यांच्या हेलिकॉप्टरमध्ये तांत्रिक बिघाड
    • खिडकीतून मण्यार आता घुसला अन् होत्याचे नव्हते!
    • भर पावसातली महाबळेश्वर पिकनिक थेट जीवावर बेतली
    Facebook X (Twitter) Instagram
    लोकशाही लोकशाही
    Demo
    • होम
    • राष्ट्रीय
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
    • जळगाव
      • जळगाव जिल्हा
    • राजकारण
    • गुन्हे वार्ता
      • अपघात
    • संपादकीय
      • लोकशाही विशेष
    • व्हिडीओ
    • ई-पेपर
    • आणखी
      • हवामान
      • कृषी
      • नोकरी संदर्भ
      • आरोग्य
      • शैक्षणिक
      • खाद्य संस्कृती
      • राशी भविष्य
      • अध्यात्म
      • लोकार्थ
      • पॉडकास्ट
    लोकशाही लोकशाही
    Home»ताज्या बातम्या»अल्पवयीन मुलीचे अपहरण करणारे दोघे ताब्यात
    ताज्या बातम्या

    अल्पवयीन मुलीचे अपहरण करणारे दोघे ताब्यात

    Team Lokshahi LiveBy Team Lokshahi LiveJune 13, 2026No Comments401 Views
    Facebook Twitter Pinterest LinkedIn WhatsApp Reddit Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    जळगाव – जामनेर शहरातील एका अल्पवयीन मुलीचे अपहरण केल्याप्रकरणी जामनेर पोलिसांनी मध्यप्रदेशातील इटारसी येथून दोघांना ताब्यात घेतले आहे. प्राप्त माहितीनुसार जामनेर येथील एका अल्पवयीन मुलीला फूस लावून पळवून नेण्यात आले होते. याबाबत मुलीच्या आईने जामनेर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. तक्रारीनंतर पोलिसांनी गुन्हा नोंदवून तपासाची चक्रे वेगाने फिरवली.
    तपासादरम्यान तांत्रिक माहितीच्या आधारे संबंधित मुलगी मध्यप्रदेशातील इटारसी येथे असल्याचे निष्पन्न झाले. त्यानुसार पोलिसांचे पथक इटारसी येथे रवाना झाले. या कारवाईत मुलीला इटारसी येथून ताब्यात घेत तीची सुटका करण्यात आली असून दोघा संशयितांना ताब्यात घेण्यात आले आहे. पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या संशयित आरोपींमध्ये अमीन खाटीक (वय 31) व अक्रम शाह मोहम्मद शाह (वय 20, रा. जामनेर) यांचा समावेश असल्याचे वृत्त आहे. दोघांविरुद्ध अपहरणासह संबंधित कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, मुलीची वैद्यकीय तपासणी करण्यात येणार असून न्यायालयीन प्रक्रियेनंतर तिला कुटुंबीयांच्या ताब्यात देण्यात येणार असल्याची माहिती मिळाली आहे. या प्रकरणाचा पुढील तपास जामनेर पोलीस स्टेशनचे पोलिस निरीक्षक मुरलीधर कासार यांच्या मार्गदर्शनाखाली सुरु आहे.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Telegram Email
    Team Lokshahi Live
    • Website

    Related Posts

    TET पेपरफुटी : सोलापुरातून प्रशिक्षण केंद्र चालकाला अटक

    August 11, 2026

    वेल्हाळे कपिलेश्वर महादेव मंदिरात १७ ऑगस्टला मुकुट सोहळा

    August 11, 2026

    राजस्थानमधील व्यापाऱ्याकडून सात लाखांची फसवणूक

    August 11, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Lokshahi Live. Designed by ContentOcean Infotech.
    • Contact Us
    • About us

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

    whatsapp-Gif