Close Menu
लोकशाही लोकशाही
    Facebook X (Twitter) Instagram
    Trending
    • नव्या आयुक्तांकडून अपेक्षा!
    • जळगाव आयुक्तपदी आदित्य जिवणे यांची नियुक्ती 
    • तुकाराम मुंढे यांचा धडाका : भेसळकरांना भरली धडकी!
    • अमृत योजनेच्या निकृष्ट कामाविरोधात मनपावर ‘घागर फोडो’ मोर्चा!
    • इस्रायलमध्ये शिवरायांचा भव्य पुतळा उभारणार
    • कृषिमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली उद्या केळी उत्पादकांच्या प्रश्नांवर उच्चस्तरीय बैठक
    • पाकिस्तानच्या जवानांचा थेट कामावर येण्यास नकार
    • युवासेना आयोजित जिल्हास्तरीय ‘सडेतोड’ वक्तृत्व स्पर्धा
    Facebook X (Twitter) Instagram
    लोकशाही लोकशाही
    Demo
    • होम
    • राष्ट्रीय
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
    • जळगाव
      • जळगाव जिल्हा
    • राजकारण
    • गुन्हे वार्ता
      • अपघात
    • संपादकीय
      • लोकशाही विशेष
    • व्हिडीओ
    • ई-पेपर
    • आणखी
      • हवामान
      • कृषी
      • नोकरी संदर्भ
      • आरोग्य
      • शैक्षणिक
      • खाद्य संस्कृती
      • राशी भविष्य
      • अध्यात्म
      • लोकार्थ
      • पॉडकास्ट
    लोकशाही लोकशाही
    Home»मनोरंजन»‘आशिकी’ फेम राहुल रॉय झाला रील्समुळे ट्रोल
    मनोरंजन

    ‘आशिकी’ फेम राहुल रॉय झाला रील्समुळे ट्रोल

    ट्रोल करणाऱ्यांना राहुल रॉयचं सडेतोड उत्तर
    Team Lokshahi LiveBy Team Lokshahi LiveApril 30, 2026No Comments333 Views
    Facebook Twitter Pinterest LinkedIn WhatsApp Reddit Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

     

    लोकशाही न्यूज नेटवर्क

    ‘आशिकी’ फेम अभिनेता राहुल रॉय सध्या त्याच्या काही रील्समुळे सोशल मीडियावर चर्चेत आला आहे. या रीलमुळे त्याला प्रचंड ट्रोल केलं जातंय. एका कंटेंट क्रिएटरसोबत राहुलने हे रील्स शूट केले असून त्यावर नेटकऱ्यांनी विविध प्रतिक्रिया दिल्या आहेत. असा कोणता नाईलाज होता, ज्यामुळे असे रील्स करावे लागले, असा सवाल नेटकऱ्यांनी केला. या ट्रोलिंगवर अखेर राहुल रॉयने प्रतिक्रिया दिली आहे. इन्स्टाग्रामवर भलीमोठी पोस्ट लिहित त्याने यामागचं कारण सांगितलं आहे. किमान मी मेहनतीने पैसे कमावतोय, दुसऱ्यांनी खिल्ली उडवून नाही, असं प्रत्युत्तर त्याने ट्रोल करणाऱ्यांना दिलं आहे.

    राहुल रॉयची पोस्ट-

    ‘मी माझं काम प्रामाणिकपणे आणि विनम्रतेने करतो. मला काही कायदेशीर प्रकरणांमध्ये पैसे द्यायचे आहेत आणि ही प्रकरणं आजची नाहीत. ही त्यावेळची आहेत, जेव्हा मला ब्रेक स्ट्रोक आला नव्हता. जर तुम्ही माझ्या साधेपणाची किंवा माझ्या समस्यांची खिल्ली उडवत असाल, ट्रोल करत असाल तर हे माझ्याबद्दल कमी आणि तुमच्याबद्दल अधिक सांगतं. जर तुम्हाला खरंच इतकी चिंता असेल तर मला एखादं चांगलं आणि योग्य काम मिळवण्यात मदत करा, जेणेकरून मी माझ्या खटल्यांचे पैसे देऊ शकेन. कमीत कमी मी मेहनत करून पैसे कमावतोय, दुसऱ्यांची खिल्ली उडवून नाही,’ अशा शब्दांत राहुलने सुनावलं.

    या पोस्टमध्ये तो पुढे म्हणाला, ‘ब्रेक स्ट्रोकनंतर मला सक्रिय राहणं गरजेचं आहे. मी जोपर्यंत जिवंत आहे, तोपर्यंत मला काम करायचं आहे. यामुळे माझा मेंदू सक्रिय राहील आणि मला या जबाबदारीची जाणीव राहील की मी आजसुद्धा काम करतोय. अर्थात याने कधी कधी थोडंफार दु:ख होतं, पण तुम्ही माझं मनोबल तोडू शकत नाही.’

    राहुल रॉयसोबतचे हे रील्स डॉ. वनिता घाडगे नावाच्या एका युजरने इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत. यामध्ये राहुल त्या महिलेसोबत त्याच्याच लोकप्रिय गाण्यावर अभिनय करताना दिसत आहे. या व्हिडीओमधील राहुलच्या चेहऱ्यावर स्पष्ट संकोचलेपणा दिसून येत आहे. यामध्ये एकीकडे ती महिला त्याच्या आजूबाजूला नाचतेय, फिरतेय आणि प्रेम व्यक्त करतेय, तर दुसरीकडे राहुल तिच्यासमोर एखाद्या पुतळ्यासारखा स्तब्ध आणि चेहऱ्यावर कोणत्याही हावभावाशिवाय उभा आहे.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Telegram Email
    Team Lokshahi Live
    • Website

    Related Posts

    रवीना टंडनच्या आईच्या विश्वासाचा गैरफायदा

    June 2, 2026

    ‘डॉन 3’ वादात सलमानच्या मध्यस्थीची चर्चा : मतभेद सोडवणार

    May 29, 2026

    भोंदू खरातच्या कारनाम्यांवरचा चित्रपट लवकरच तुमच्या भेटीला

    May 26, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Lokshahi Live. Designed by ContentOcean Infotech.
    • Contact Us
    • About us

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

    whatsapp-Gif