‘झुंड’ पाहून आमिर खानचे डोळे पाणावले; म्हणाला.. मी नि:शब्द.. (व्हिडीओ)

0

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क

मराठमोळे दिग्दर्शक नागराज मंजुळे (Nagraj Manjule) यांनी हिंदीत पदार्पण करत आहेत. ‘सैराट’ (Sairat)  या अभूतपूर्व चित्रपटानंतर त्यांचा पहिला वहिला हिंदी सिनेमा ‘झुंड’ ( Jhund) येत्या 4 मार्चला प्रेक्षकांच्या भेटीस येतोय.

यात महानायक अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) यांची मध्यवर्ती भूमिका असलेला हा सिनेमा पाहण्यास चाहते उत्सुक आहेत. पण त्याआधी बॉलिवूडचा मिस्टर परफेक्शनिस्ट आमिर खान (Aamir Khan) याने सिनेमा पाहिलाये आणि त्याची प्रतिक्रिया मराठी माणसाचा ऊर अभिमानाने भरून यावा अशीच आहे. होय, ‘झुंड’ पाहून आमिर खानला त्याचे अश्रू रोखता आले नाहीत. हा मी पाहिलेल्या सर्वोत्तम चित्रपटांपैकी एक आहे, अशी प्रतिक्रिया त्याने दिलीये.

‘झुंड’बद्दल भरभरून कौतुक

आमिर खानसाठी ‘झुंड’चं स्पेशल स्क्रिनिंग ठेवण्यात आलं होतं. या स्क्रिनिंगला नागराज मंजुळे, टी सीरिजचे भूषण कुमार आणि चित्रपटातील कलाकार उपस्थित होते. चित्रपट संपला आणि स्क्रिनिंगला उपस्थित सगळ्यांनी उभं राहून टाळ्यांचा कडकडाट केला. आमिरला तर चित्रपटाचं कौतुक करायला शब्द मिळेनात. चित्रपट पाहताना त्याचे अक्षरश: डोळे पाणावले. या स्पेशल स्क्रिनिंगचा व्हिडीओ नागराज यांनी शेअर केला आहे. यात आमिर ‘झुंड’बद्दल भरभरून बोलतोय.

मी नि:शब्द झालोय

‘पहिल्यांदाच एका चित्रपटाच्या प्रायव्हेट स्क्रिनिंगला सगळ्यांनी उभं राहून टाळ्या वाजवल्याची घटना घडली. चित्रपट पाहून मी नि:शब्द झालोय. माझ्याकडे शब्द नाहीत. तुम्ही भारतीय मुलामुलींच्या भावनांना ज्याप्रकारे पडद्यावर दाखवलंय, ते मी शब्दांत सांगू शकत नाही. मुलांनी काय काम केलंय. चित्रपटाचं जेवढं कौतुक करावं ते कमी आहे. या चित्रपटाने मला आश्चर्यचकीत करून सोडलं आहे. जे आम्ही गेल्या 20-30 वर्षांत करू शकलो नाही, ते नागराजनं या एका चित्रपटातून करून दाखवलं आहे. अमिताभ बच्चन यांच्या करिअरमधील सर्वोत्तम चित्रपटांपैकी हा एक आहे,’ अशा शब्दांत आमिरने ‘झुंड’चं कौतुक केलं.

 

Leave A Reply

Your email address will not be published.