Close Menu
लोकशाही लोकशाही
    Facebook X (Twitter) Instagram
    Trending
    • कुस्तीपटू अश्विनी पौळ यांची मुलांसह आत्महत्या
    • आमदारांच्या उपस्थितीत भाजप महिला आघाडीचे रक्षाबंधन
    • स्व डॉ. चारुदत्त साने यांच्या जयंतीनिमित्त रविवारी मोफत रोगनिदान शिबीराचे आयोजन
    • हल्ल्यानंतर विद्यानंद बापटांनी स्पष्ट केली मोठी भूमिका
    • उज्बेकिस्तानमधून सांगण्यापेक्षा देशात पत्रकार परिषद घ्या!
    • विमानाची पार्किंगदरम्यान खांबाला जोरदार धडक
    • बी.एन. अग्रवाल कन्स्ट्रक्शनचे निकृष्ठ काम चव्हाट्यावर!
    • अल्पवयीन विद्यार्थिनीवर अत्याचार; त्या नराधम शिक्षकास अद्दल घडवा!
    Facebook X (Twitter) Instagram
    लोकशाही लोकशाही
    Demo
    • होम
    • राष्ट्रीय
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
    • जळगाव
      • जळगाव जिल्हा
    • राजकारण
    • गुन्हे वार्ता
      • अपघात
    • संपादकीय
      • लोकशाही विशेष
    • व्हिडीओ
    • ई-पेपर
    • आणखी
      • हवामान
      • कृषी
      • नोकरी संदर्भ
      • आरोग्य
      • शैक्षणिक
      • खाद्य संस्कृती
      • राशी भविष्य
      • अध्यात्म
      • लोकार्थ
      • पॉडकास्ट
    लोकशाही लोकशाही
    Home»गुन्हे वार्ता»आम आदमी पक्षाच्या नेत्याची गोळ्या झाडून हत्या
    गुन्हे वार्ता

    आम आदमी पक्षाच्या नेत्याची गोळ्या झाडून हत्या

    चारचाकी गाडीतून आले अन् गोळ्या झाडून फरार
    Team Lokshahi LiveBy Team Lokshahi LiveAugust 30, 2026No Comments230 Views
    Facebook Twitter Pinterest LinkedIn WhatsApp Reddit Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

     

    लोकशाही न्यूज नेटवर्क

    पंजाबमधील फिरोजपूर जिल्ह्यातून एक अत्यंत धक्कादायक बातमी समोर आली आहे. आम आदमी पक्षाचे स्थानिक नेते गुरप्रीत सिंह यांची चार अज्ञात हल्खोरांनी गोळ्या झाडून निर्घृण हत्या केली आहे. हल्लेखोर एका चारचाकी गाडीतून आले होते आणि त्यांनी अचानक गुरप्रीत सिंह यांच्यावर अंदाधुंद गोळीबार केला. या घटनेनंतर संपूर्ण परिसरात एकच खळबळ उडाली असून भीतीचे वातावरण पसरले आहे.

    पंजाबमध्ये कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न पुन्हा एकदा एरणीवर आला आहे. फिरोजपूर जिल्ह्यात आपचे नेते गुरप्रीत सिंह यांची गोळ्या मारून हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली आहे. प्राथमिक माहितीनुसार, गुरप्रीत सिंह आपल्या कामात व्यस्त असताना एका कारमधून चार अज्ञात सशस्त्र हल्लेखोर त्या ठिकाणी पोहोचले. काही समजण्याच्या आतच त्यांनी गुरप्रीत सिंह यांच्यावर जवळून गोळ्या झाडण्यास सुरुवात केली. हल्ल्यात गंभीर जखमी झालेले गुरप्रीत सिंह रक्ताच्या थारोळ्यात कोसळले. यानंतर हल्लेखोर पसार झाले.

    घटनेनंतर स्थानिक लोकांनी आणि समर्थकांनी तातडीने गुरप्रीत सिंह यांना जवळच्या रुग्णालयात दाखल केले. मात्र, गंभीर दुखापतींमुळे उपचारादरम्यान डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. या घटनेची माहिती मिळताच पक्षाचे कार्यकर्ते आणि स्थानिक नागरिकांनी रुग्णालयाबाहेर मोठी गर्दी केली होती.

    घटनेची माहिती मिळताच पोलीस दल तातडीने घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी संपूर्ण परिसर सील केला असून पुरावे गोळा करण्याचे काम सुरू केले आहे. हल्खोरांचा माग काढण्यासाठी आसपासच्या भागातील सीसीटीव्ही फुटेज तपासले जात आहेत. ही हत्या जुन्या वैमनस्यातून झाली की यामागे काही राजकीय कट आहे, या सर्व बाजूंनी पोलीस सध्या तपास करत आहेत. या घटनेमुळे पंजाबच्या राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Telegram Email
    Team Lokshahi Live
    • Website

    Related Posts

    उज्बेकिस्तानमधून सांगण्यापेक्षा देशात पत्रकार परिषद घ्या!

    September 4, 2026

    विमानाची पार्किंगदरम्यान खांबाला जोरदार धडक

    September 4, 2026

    स्वराची जीभ कापणाऱ्याला 1.51 लाख रुपयांचं बक्षीस

    September 3, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Lokshahi Live. Designed by ContentOcean Infotech.
    • Contact Us
    • About us

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

    whatsapp-Gif