Wednesday, August 10, 2022

आदित्य ठाकरे जळगाव जिल्ह्याच्या दौऱ्यावर

- Advertisement -

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क 

- Advertisement -

माजी मंत्री तथा युवासेनेचे अध्यक्ष आदित्य ठाकरे (aaditya Thackeray) जळगाव (Jalgaon) जिल्ह्याच्या दौऱ्यावर येणार आहेत. ९ ऑगस्ट रोजी तीन तालुक्यांमध्ये त्यांच्या सभा होणार आहेत.

- Advertisement -

- Advertisement -

शिवसेनेत उभी पडून राज्यात मोठा सत्ता संघर्ष निर्माण झाला. शिवसेनेतून बंडखोरी करून अनेक जण शिंदे गटात सामील झाले. यामुळे जळगाव जिल्ह्यात शिवसेनेला जबर धक्का बसला आहे. पक्षाचे चार समर्थक एक अशा पाच आमदारांनी शिंदे गटाची साथ घेतली आहे. यामुळे शिवसेनेचा बालेकिल्ला समजल्या जाणाऱ्या जळगाव जिल्ह्यात शिवसेना ढासळल्याचे चित्र आहे.

मात्र एकीकडे आमदारांनी शिंदे गटाकडे धाव घेतली असली तरी बहुतांश पदाधिकारी अद्यापही उध्दव ठाकरे यांच्यासोबत असल्याचे आज तरी दिसून येत आहे. दोन दिवसांपूर्वीच जिल्ह्यातील पदाधिकार्‍यांनी मातोश्रीवर भेट दिली असता उध्दव ठाकरे यांनी आक्रमक भाषण करून त्यांच्या पाठीशी भक्कमपणे उभे राहण्याची ग्वाही दिली होती. या पाठोपाठ आदित्य ठाकरे हे जळगाव जिल्हा दौर्‍यावर येत आहेत.

आदित्य ठाकरे हे मंगळवार दिनांक ९ ऑगस्ट रोजी जळगाव जिल्ह्यात येत आहेत. यात जळगाव विमानतळावरून ते पाचोरा येथे जाणार असून साडे अकरा वाजता ते स्थानिक पदाधिकार्‍यांशी संवाद साधतील. यानंतर दुपारी पावणेदोन वाजता ते धरणगावात सभा घेणार आहेत. तर तीन वाजता पारोळा येथे सभा घेतल्यानंतर ते धुळे, मालेगावमार्गे नाशिकला जाणार आहेत. आदित्य ठाकरे यांच्या दौर्‍याचे शिवसेना व युवासेनेतर्फे नियोजन करण्यात येत आहे.

 

 

- Advertisement -
spot_imgspot_img

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

हे वाचायलाच हवे

संबंधित बातम्या