hgtv home design software coupon dance related christmas gifts moma sf gift shop garnet hill free shipping coupon july 2012 napa soap coupon
Monday, December 5, 2022

‘दृढ संकल्पामुळे यश प्राप्ती होते.’

- Advertisement -

 

- Advertisement -

प्रवचन सारांश – 21/09/2022

- Advertisement -

- Advertisement -

 

दृढ संकल्प असेल तर भौतिक आणि आध्यात्मिक जीवनात हमखास यश प्राप्त होते असे मौलीक विचार पूज्य जयधुरंधर मुनी यांनी आजच्या प्रवचनात मांडले.

 

परस्पर संयोग भाव हा जैन दर्शनचा पाया आहे. ‘जिओ और जिने दो…’ हा नारा सर्वश्रुत आहे. जैनी दुसऱ्यांना सहकार्य करत असतात. इतकेच काय पर्यावरण संतुलन राखण्यात देखील परस्पर सहकार्य राखले जाते. जीवो जीवस्य जीवनमं ह्या न्यायाने हेच जीव एकमेकांचे अन्न बनतात व पर्यावरणाचे संतुलन बनून राहते, निसर्ग चक्र सुरू राहते. ‘बने जहां तक औरोंका उपकार करूँ’ असे ‘मेरी भावना’ रचनेत सांगण्यात आले आहे. फक्त जैन नव्हे तर यातील जगातील प्रत्येक व्यक्तीने परस्परांना सह‌कार्य करावे म्हणजे स्वतःबरोबर इतरांचीही प्रगती साध्य होऊ शकते. आगम शास्त्रात तर ‘दान’ हे स्वर्गाचे द्वार मानलेले आहे. जगात केवळ 0.5 टक्के संख्या जैनांची आहे परंतु दान, परोपकार, सहकार्यात त्यांचाच नंबर एक लागतो. असे मौलिक विचार आजच्या प्रवचनात मांडण्यात आले. डॉ. पदमचंद्र मुनी यांचे सुशिष्य जयपुरंदर मुनी यांनी ‘मेरी भावना’ विषयावर प्रवचन केले.

जयगच्छाधिपती 12 वे पट्ट्धर आचार्य श्री पार्श्वचंद्र जी म.सा., डॉ. पदमचंद्र म.सा. आदिठाणा ७ यांच्या पवित्र सान्निध्यात चातुर्मास सुरू आहे. त्यात आजच्या आपल्या प्रवचनात परस्पर संयोग, सौजन्य, दान याबाबतचे महत्त्व सांगत होते. मारवाड प्रांतात मोठा दुष्काळ पडला होता. त्यावेळी रियासेठा गावातील शेठ जीवनदास मुणोत यांनी जोधपुरच्या राजाला मदत केली. इतिहासातील दानी, सौजन्यशील व्यक्ती बद्दल त्यांनी उदाहरणे दिली. दानशील, सौजन्य करणाऱ्या त्या सर्वांच्या उपकराला स्मरण करून त्यांची उदारतेची भावना आपल्यामध्ये यावी अशी अपेक्षा व्यक्त केली.

 

“आगम शास्त्र’ प्रवचन श्रृंखलेत डॉ. पदमचंद्र मुनी यांचे सुशिष्य जयधुरंधर मुनी यांनी आजच्या प्रवचनात सांगितले की, ‘विकल्प’ असेल तर असफलता व  ‘संकल्प’ असेल तर सफलता असते. व्यक्तिगत जीवनात असो वा आध्यात्मिक जीवनात असो हमखास यश हवे असेल तर त्यासाठी आधी संकल्प करावा असा मोलाचा विचार आजच्या प्रवचनात दिला. ४ गतीमध्ये प्रत्येक जीव फिरत असतो. फिरणे  प्रत्येक जीवाला आवडत असते. या संदर्भात उदाहरण स्पष्ट करण्यासाठी त्यांनी पिता त्यांचे 2 पुत्र यांचे रुपक सांगितले. 2 पुत्रांचे 12 व्या वेळी लवण समुद्र पार करण्याच्या आगमशास्त्रातील संदर्भ कथेचा उल्लेख आपल्या प्रवचनातून केला. येत्या रविवारी २५ रोजी डॉ. पद्मचंद्र मुनी यांचे विशेष प्रवचन होईल सर्वांनी  दररोज सकाळी 9.00 वाजता होणाऱ्या आध्यात्मिक प्रवचनाचा लाभ घ्यावे असे आवाहन करण्यात आले. याशिवाय बाहेरगावहून आलेल्या श्री संघांचे स्वागत देखील करण्यात आले…

———□■□■ ————

पू. डॉ. पदमचंद्रजी मुनी यांचे सुशिष्य पू. जयधुरंधर मुनी यांचे जळगावात प्रवचन सुरु असून किशोर कुलकर्णी यांनी शब्दांकन केलेली त्यांची ‘मेरी भावना’ ही प्रवचन मालिका दै. लोकशाही ~ लोकलाईव्हवर प्रसिद्ध करीत आहोत. रोजचं नवीन प्रवचन जरूर वाचा फक्त लोकशाही वर…

- Advertisement -
spot_imgspot_img

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

हे वाचायलाच हवे

संबंधित बातम्या