लोकशाही न्यूज नेटवर्क

मलकापूर शहरालगतच्या जग्गु मामा ढाब्याजवळ भरधाव ट्रकने दुचाकीला धडक दिल्याने झालेल्या भीषण अपघातात यवतमाळ जिल्ह्यातील ३० वर्षीय युवकाचा मृत्यू झाल्याची घटना रविवारी मध्यरात्री घडली. या प्रकरणी मलकापूर शहर पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, ध्रुव साहेबराव लांजेवार (वय ३०, रा. दारबा नगर, वाडेगाव, जि. यवतमाळ) हे दुचाकीने जात असताना जग्गु मामा ढाब्याजवळ अज्ञात ट्रकने त्यांच्या वाहनाला जोरदार धडक दिली. या अपघातात गंभीर जखमी झालेल्या ध्रुव लांजेवार यांना नातेवाईकांनी तातडीने उपजिल्हा रुग्णालय मलकापूर येथे आणले. मात्र वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यांना मृत घोषित केले.
उपजिल्हा रुग्णालयातील डॉ. शुभांगी फेंगडे यांच्या तर्फे कक्षसेवक संतोष कडू गवळी यांनी याबाबतची माहिती मलकापूर शहर पोलीस स्टेशन येथे दिली. त्यावरून मर्ग क्रमांक 30/2026 कलम 194 बीएनएसएस प्रमाणे नोंद करण्यात आली आहे. या घटनेचा प्राथमिक तपास पोउपनि शुभम बरदाडे करीत असून अपघातातील ट्रकचा शोध घेण्याचे काम पोलीसांकडून सुरू आहे.


