शिंदाड ता. पाचोरा
कुऱ्हाड बुद्रुक येथील रहिवाशी २२ वर्षीय तरुणीवर गावातीलच २६ वर्षीय तरुणाने लग्नाचे आमिष दाखवून शारीरिक संबंध प्रस्थापित केल्याची घटना घडली. दरम्यान लग्नाला नकार देत वेळोवेळी बलात्कार करणाऱ्या तरुणा विरोधात पिंपळगाव हरेश्वर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला असून फरार आरोपीला पिंपळगाव पोलिसांनी अटक केली.
सविस्तर असे की, कुऱ्हाड. बु. येथील राहणारी पीडित वय 22 वर्ष हिस आरोपी आकाश शांताराम ठाकरे वय वर्ष २६ राहणार कुऱ्हाड. खु. ता पाचोरा याने लग्नाचे आमिष दाखवून तिच्या सोबत लग्न न करता शरीर संबंध केले. दरम्यान सदर गुन्ह्यातील पडीतीने पिंपळगाव हरेश्र्वर पोलीस स्टेशन गु. र. नं २९७|२०२४ भा. न्या. स. कलम६९ प्रमाने यातील पिडीता फिऱ्यादी हिने १३-११-२०२४ रोजी फिऱ्यादी दिल्यावरुन दाखल केला.
अश्यात आरोपी आकाश शांताराम ठाकरे वय २६ वर्षे रा. कुऱ्हाड खु. हा सुमारे दिड महिन्यांपासून फरार होता. त्यास शिताफीने पकडून सदर गुन्ह्यात अटक करण्यात आले असून त्यास मा. न्यायालयाने दोन दिवस पोलीस कस्टडी दिली आहे. सदर गुण्याचा गुन्ह्याचा तपास पोलीस उपनिरीक्षक सर्जेराव क्षीरसागर करीत आहे.
सदर गुन्ह्याचा तपास पोलीस अधीक्षक महेश्वर रेड्डी अप्पर पोलीस अधीक्षक कविता नेरकर यांच्या मार्गदर्शनाखाली मा. उपविभागीय पोलीस अधिकारी पाचोरा भाग श्री धनंजय येरुळे, पो. स्टे प्रभारी अधिकारी स. पो. नि. प्रकाश काळे व पो. उ. नि. सर्जेराव क्षीरसागर व पोना १३६६ राहुल बेहेरे पोलीस कॉन्स्टेबल २४४४ अमोल पाटील पो कॉ १७३६ इम्रान पठाण यांनी केला.