Close Menu
लोकशाही लोकशाही
    Facebook X (Twitter) Instagram
    Trending
    • पारडी येथे “आदिवासी सल्ला शक्ती स्थापना दिन” उत्साहात
    • भुसावळच्या प्रभारी नगराध्यक्ष शैलजा नारखेडे यांचे अभिनंदन!
    • खालसा हेल्प फाउंडेशनची कार्यकारिणी जाहीर
    • पुढील 3 दिवसात विक्रमी तापमानाची नोंद होणार
    • आरटीआय कार्यकर्त्याची भरदिवसा ठेचून हत्या
    • लासूर येथे वारकरी बालसंस्कार शिबिर उत्साहात
    • तीन लहान मुलांनी आरोपीला रोखण्याचा केला होता प्रयत्न
    • सूर्यनारायण कोपला.. काळजी घ्या..!
    Facebook X (Twitter) Instagram
    लोकशाही लोकशाही
    Demo
    • होम
    • राष्ट्रीय
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
    • जळगाव
      • जळगाव जिल्हा
    • राजकारण
    • गुन्हे वार्ता
      • अपघात
    • संपादकीय
      • लोकशाही विशेष
    • व्हिडीओ
    • ई-पेपर
    • आणखी
      • हवामान
      • कृषी
      • नोकरी संदर्भ
      • आरोग्य
      • शैक्षणिक
      • खाद्य संस्कृती
      • राशी भविष्य
      • अध्यात्म
      • लोकार्थ
      • पॉडकास्ट
    लोकशाही लोकशाही
    Home»गुन्हे वार्ता»हळदीत कट्टा खोचून फिरणाऱ्या तरुणाला अटक
    गुन्हे वार्ता

    हळदीत कट्टा खोचून फिरणाऱ्या तरुणाला अटक

    Team Lokshahi LiveBy Team Lokshahi LiveMay 6, 2026No Comments265 Views
    Facebook Twitter Pinterest LinkedIn WhatsApp Reddit Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

     

    जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क

    लग्नसमारंभातील हळदीच्या कार्यक्रमात कमरेला गावठी कट्टा लावून नागरिकांमध्ये दहशत निर्माण करणाऱ्या एका तरुणाला कासोदा पोलिसांनी फिल्मी स्टाईलने सापळा रचून अटक केली आहे. लखन प्रकाश वाघ (वय 24, रा. परधाडे, ता. पाचोरा) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव असून त्याच्याकडून एक पिस्तूल आणि जिवंत काडतूस हस्तगत करण्यात आले आहे.

    प्राप्त माहितीनुसार दि. 3 मे रोजी एरंडोल तालुक्यातील ताडे येथे एका हळदी समारंभाचे आयोजन करण्यात आले होते. रात्री 11:30 वाजेच्या सुमारास बँडच्या तालावर नाचत असताना लखन वाघ याच्या कमरेला एक शस्त्र (अग्निशस्त्र) खोचलेले असल्याचे काही उपस्थितांना दिसले. याबाबत नागरिकांनी विचारणा करण्यास सुरुवात करताच, आरोपीने गर्दीचा फायदा घेत तेथून पळ काढला. या प्रकारामुळे परिसरात भीतीचे वातावरण पसरले होते.

    या घटनेची माहिती मिळताच कासोदा पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक श्रीकांत पाटील यांनी तपासाचे आदेश दिले. 5 मे रोजी पोलिसांना खात्रीशीर बातमी मिळाली की, संशयित आरोपी लखन वाघ हा पुन्हा ताडे गावाच्या परिसरात शस्त्र घेऊन फिरत आहे. या माहितीवरून पोलिसांनी तातडीने भातखेडे चौफुली येथे सापळा रचला. संशयित आरोपी तिथे येताच पोलिसांनी त्याला घेराव घालून ताब्यात घेतले. अंगझडती घेतली असता त्याच्याकडे एक गावठी कट्टा आणि एक जिवंत काडतूस आढळून आले.

    पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अपर पोलीस अधीक्षक कविता नेरकर, चाळीसगाव विभागाचे डीवायएसपी विजयकुमार ठाकूरवाड यांच्या मार्गदर्शनाखाली कासोदा पोलीस स्टेशनचे प्रभारी सपोनि श्रीकांत पाटील, पीएसआय धर्मराज पाटील, पोलीस कर्मचारी निलेश गायकवाड, योगेश पाटील आणि सोनू पाचुंदे यांच्या पथकाने ही धाडसी कारवाई केली. आरोपीविरुद्ध अवैध शस्त्र बाळगल्याप्रकरणी भारतीय हत्यार कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून, त्याने हे शस्त्र कोठून आणले याचा तपास पोलीस करत आहेत.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Telegram Email
    Team Lokshahi Live
    • Website

    Related Posts

    आरटीआय कार्यकर्त्याची भरदिवसा ठेचून हत्या

    May 13, 2026

    लासूर येथे वारकरी बालसंस्कार शिबिर उत्साहात

    May 13, 2026

    तीन लहान मुलांनी आरोपीला रोखण्याचा केला होता प्रयत्न

    May 13, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Lokshahi Live. Designed by ContentOcean Infotech.
    • Contact Us
    • About us

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

    whatsapp-Gif