Close Menu
लोकशाही लोकशाही
    Facebook X (Twitter) Instagram
    Trending
    • शिक्षकाचे चौथीच्या ५ विद्यार्थिनींशी अश्लील चाळे
    • तर अमेरिका इराणचे सर्वकाही नष्ट करेल..
    • फरार फौजदारासह पुत्राला अटक
    • इराण-इस्त्रायल युद्धामुळे साखरेचा गोडवा हरवला
    • सावित्रीमाईंची क्रांती हाच स्त्री शिक्षणाचा खरा आधार!
    • पत्रकार, वृत्तपत्र विक्रेते महामंडळे लवकरच स्थापन करणार!
    • स्थानिक आणि संजय गांधी उद्यान प्रशासनात वाद!
    • हुंडाबळीच्या घटना पुरोगामी महाराष्ट्रात धक्कादायक!
    Facebook X (Twitter) Instagram
    लोकशाही लोकशाही
    Demo
    • होम
    • राष्ट्रीय
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
    • जळगाव
      • जळगाव जिल्हा
    • राजकारण
    • गुन्हे वार्ता
      • अपघात
    • संपादकीय
      • लोकशाही विशेष
    • व्हिडीओ
    • ई-पेपर
    • आणखी
      • हवामान
      • कृषी
      • नोकरी संदर्भ
      • आरोग्य
      • शैक्षणिक
      • खाद्य संस्कृती
      • राशी भविष्य
      • अध्यात्म
      • लोकार्थ
      • पॉडकास्ट
    लोकशाही लोकशाही
    Home»अपघात»चोरीच्या खोट्या गुन्ह्यात गोवल्याने तरुणाने संपवले जीवन
    अपघात

    चोरीच्या खोट्या गुन्ह्यात गोवल्याने तरुणाने संपवले जीवन

    Team Lokshahi LiveBy Team Lokshahi LiveFebruary 26, 2026No Comments0 Views
    Facebook Twitter Pinterest LinkedIn WhatsApp Reddit Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

     

    शिंदाड ता. पाचोरा

    चोरीच्या खोट्या आरोपामुळे मानसिक त्रास सहन करावा लागल्याने शिंदाड येथील २२ वर्षीय युवकाने पुण्यात रेल्वेखाली आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत असून संबंधितांवर कठोर कारवाईची मागणी केली आहे.

    याबाबत प्राप्त माहिती अशी की, शिंदाड येथील अतुल लक्ष्मण अहिरे (वय २२) हा युवक पुणे जिल्ह्यातील वाघोली परिसरात असलेल्या प्राणा बँकवेट हॉटेलमध्ये नोकरी करत होता. तो मागील काही महिन्यांपासून तेथे कामावर होता. दरम्यान, हॉटेलमध्ये चोरी झाल्याचा आरोप त्याच्यावर ठेवण्यात येऊन गुन्हा काबुल करण्यास हॉटेल संचालकांनी अतुल यास सक्ती करून सह्या घेतल्या. संबंधित व्यवस्थापनाने त्याच्यावर दबाव टाकून मारहाण व शिवीगाळ केल्याचा आरोप नातेवाईकांनी केला आहे.

    याबाबत मयत युवकाच्या भावाने दिलेल्या तक्रारीनुसार, २३ फेब्रुवारी २०२६ रोजी रात्री सुमारे ११ वाजण्याच्या सुमारास पुणे येथील सासवड रोड रेल्वे स्टेशनजवळील रेल्वे पटरीवर अतुल याने रेल्वेखाली झोकून देत आत्महत्या केली. घटनेपूर्वी त्याने मोबाईलवर संदेश पाठवून आपल्यावर चोरीचा खोटा आरोप करण्यात आल्याचे तसेच मानसिक त्रास दिला जात असल्याचे नमूद केल्याचे तक्रारीत म्हटले आहे.

    घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी पाठवला. या प्रकरणी संबंधित हॉटेलचे व्यवस्थापक व अन्य जबाबदार व्यक्तींविरुद्ध आत्महत्येस प्रवृत्त केल्या प्रकरणी गुन्हा दाखल करण्याची मागणी कुटुंबीयांनी केली आहे.

    या घटनेमुळे शिंदाड गावात शोककळा पसरली असून दोषींवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी ग्रामस्थांकडून होत आहे. पोलिस पुढील तपास करत आहेत.मयत अतुल याच्यावर  त्याचे पश्चात आईवडील भाऊ असा परिवार आहे.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Telegram Email
    Team Lokshahi Live
    • Website

    Related Posts

    शिक्षकाचे चौथीच्या ५ विद्यार्थिनींशी अश्लील चाळे

    March 10, 2026

    फरार फौजदारासह पुत्राला अटक

    March 10, 2026

    जिल्ह्यात तापमानाने ओलांडली चाळीशी!

    March 10, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Lokshahi Live. Designed by ContentOcean Infotech.
    • Contact Us
    • About us

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.