Close Menu
लोकशाहीलोकशाही
    Facebook X (Twitter) Instagram
    Trending
    • एमपीएससी परीक्षेबाबत दुसरे जंतर-मंतर आंदोलन करणार!
    • मुख्यमंत्री विजय यांच्या नावाने बनावट सोशल मीडिया अकाउंट
    • परिश्रमानेच यशाची प्राप्ती : स्वामी जनार्दन हरीजी महाराज
    • ब्रिक्स : सांस्कृतिक संवादातून जागतिक एकात्मतेच्या नव्या पाऊलखुणा
    • पाळधी बायपासवर कंटेनर उलटून दोनगावच्या तरुणाचा मृत्यू
    • आत्मसमर्पण टाळण्यासाठी ५ कोटी रुपये जमा करा!
    • विजय थलपती विरोधात विरोधक एकवटले
    • तुरुंगात गेल्यावर मला विपश्यनेलाच आल्यासारखं वाटलं
    Facebook X (Twitter) Instagram
    लोकशाहीलोकशाही
    Demo
    • होम
    • राष्ट्रीय
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
    • जळगाव
      • जळगाव जिल्हा
    • राजकारण
    • गुन्हे वार्ता
      • अपघात
    • संपादकीय
      • लोकशाही विशेष
    • व्हिडीओ
    • ई-पेपर
    • आणखी
      • हवामान
      • कृषी
      • नोकरी संदर्भ
      • आरोग्य
      • शैक्षणिक
      • खाद्य संस्कृती
      • राशी भविष्य
      • अध्यात्म
      • लोकार्थ
      • पॉडकास्ट
    लोकशाहीलोकशाही
    Home»अपघात»भरधाव टँकरच्या धडकेत महिलेचा मृत्यू; मुलगा गंभीर
    अपघात

    भरधाव टँकरच्या धडकेत महिलेचा मृत्यू; मुलगा गंभीर

    Team Lokshahi LiveBy Team Lokshahi LiveAugust 5, 2026Updated:August 5, 2026No Comments450 Views
    Facebook Twitter Pinterest LinkedIn WhatsApp Reddit Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

     

    जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क

    शहरातील हॉटेल दरबार ते सीएनजी गॅस पंप परिसरात बुधवारी सकाळी भीषण अपघात झाला. भरधाव वेगाने येणाऱ्या टँकरने दुचाकीला मागून जोरदार धडक दिल्याने भाजीपाला विक्री करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या मंगला अर्जुन माळी (वय 55, रा. ज्ञानदेव नगर) यांचा जागीच दुर्दैवी मृत्यू झाला. तर या अपघातात त्यांचा मुलगा भरत माळी (वय 29) गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत.

    प्राथमिक माहितीनुसार, मंगला माळी या नेहमीप्रमाणे मुलासोबत पिंप्राळा येथील आठवडे बाजारात भाजीपाला विक्रीसाठी दुचाकीवरून निघाल्या होत्या. त्याचवेळी मागून भरधाव वेगाने आलेल्या टँकरने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. धडकेच्या जोरामुळे दोघेही रस्त्यावर फेकले गेले. मंगला माळी या टँकरच्या चाकाखाली आल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला, तर मुलगा गंभीर जखमी झाला. अपघातानंतर टँकर चालकाने घटनास्थळावरून पळ काढण्याचा प्रयत्न केला. मात्र, संतप्त आणि सतर्क नागरिकांनी टँकरचा पाठलाग करून आकाशवाणी चौकातील महादेव हॉस्पिटलजवळ वाहन अडवले. त्यानंतर चालकाला एमआयडीसी पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले.

    घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. जखमीला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, मृत महिलेचा मृतदेह शवविच्छेदनासाठी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात हलविण्यात आला. मंगला माळी या अनेक वर्षांपासून भाजीपाला विक्री करून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करत होत्या. त्यांच्या पश्चात पती, दोन मुले, दोन सुना आणि नातवंडे असा परिवार आहे.

    या दुर्दैवी घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत असून, भरधाव व बेदरकार वाहनचालकांवर कठोर कारवाई करण्याची तसेच शहरात अवजड वाहनांच्या वेगावर नियंत्रण आणण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Telegram Email
    Team Lokshahi Live
    • Website

    Related Posts

    मुख्यमंत्री विजय यांच्या नावाने बनावट सोशल मीडिया अकाउंट

    September 9, 2026

    परिश्रमानेच यशाची प्राप्ती : स्वामी जनार्दन हरीजी महाराज

    September 9, 2026

    पाळधी बायपासवर कंटेनर उलटून दोनगावच्या तरुणाचा मृत्यू

    September 9, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Lokshahi Live. Designed by ContentOcean Infotech.
    • Contact Us
    • About us

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

    whatsapp-Gif