Close Menu
लोकशाही लोकशाही
    Facebook X (Twitter) Instagram
    Trending
    • शिक्षकाचे चौथीच्या ५ विद्यार्थिनींशी अश्लील चाळे
    • तर अमेरिका इराणचे सर्वकाही नष्ट करेल..
    • फरार फौजदारासह पुत्राला अटक
    • इराण-इस्त्रायल युद्धामुळे साखरेचा गोडवा हरवला
    • सावित्रीमाईंची क्रांती हाच स्त्री शिक्षणाचा खरा आधार!
    • पत्रकार, वृत्तपत्र विक्रेते महामंडळे लवकरच स्थापन करणार!
    • स्थानिक आणि संजय गांधी उद्यान प्रशासनात वाद!
    • हुंडाबळीच्या घटना पुरोगामी महाराष्ट्रात धक्कादायक!
    Facebook X (Twitter) Instagram
    लोकशाही लोकशाही
    Demo
    • होम
    • राष्ट्रीय
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
    • जळगाव
      • जळगाव जिल्हा
    • राजकारण
    • गुन्हे वार्ता
      • अपघात
    • संपादकीय
      • लोकशाही विशेष
    • व्हिडीओ
    • ई-पेपर
    • आणखी
      • हवामान
      • कृषी
      • नोकरी संदर्भ
      • आरोग्य
      • शैक्षणिक
      • खाद्य संस्कृती
      • राशी भविष्य
      • अध्यात्म
      • लोकार्थ
      • पॉडकास्ट
    लोकशाही लोकशाही
    Home»गुन्हे वार्ता»बकऱ्यांच्या व्यवहारातून दोन गटात तुफान हाणामारी
    गुन्हे वार्ता

    बकऱ्यांच्या व्यवहारातून दोन गटात तुफान हाणामारी

    Team Lokshahi LiveBy Team Lokshahi LiveFebruary 25, 2026Updated:February 25, 2026No Comments0 Views
    Facebook Twitter Pinterest LinkedIn WhatsApp Reddit Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

     

    लोकशाही न्यूज नेटवर्क

    छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील सिल्लोड तालुका अंतर्गत अंभई गावात काल मध्यरात्री दोन गट आमनेसामने येत तुफान राडा झाल्याची घटना समोर आली आहे. बकऱ्यांच्या व्यवहारातून वाद उफाळल्याने दोन गटात मारामारी झाली असून या हाणामारीत ५ ते ६ जण गंभीर जखमी झाले आहेत. तसेच पोलिसांनी तातडीने कारवाई करून १५ जणांना ताब्यात घेऊन गुन्हा दाखल केला आहे.

    मिळालेल्या माहितीनुसार, बकऱ्यांच्या व्यवहारातून सुरू झालेला वाद हळूहळू चिघळला आणि त्यानंतर दोन्ही गटांमध्ये जोरदार घोषणाबाजी व दगडफेक झाली. या वादाला पुढे राजकीय स्वरूपही प्राप्त झाल्याचे सांगितले जात आहे. एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे समर्थक आणि भाजप कार्यकर्ते असे दोन गट समोरासमोर आल्याची माहिती मिळत आहे.

    या राड्यात जमावाने तब्बल १५ ते २० वाहनांची तोडफोड केली. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या घटनेवेळी सुमारे ५०० ते ६०० लोकांचा जमाव गावात जमला होता. परिस्थिती तणावपूर्ण झाल्याने पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेत गावात तळ ठोकला. या घटनेत ५ ते ६ जण जखमी झाले असून त्यापैकी दोघांची प्रकृती गंभीर आहे.

    गंभीर जखमींना पुढील उपचारासाठी छत्रपती संभाजीनगर येथे हलवण्यात आले आहे. या मारहाणी प्रकरणानंतर गावात तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले आहे. दरम्यान, मध्यरात्री १२ वाजण्याच्या सुमारास पोलिसांनी कारवाई करत १५ जणांना ताब्यात घेतले आहे. सध्या गावात मोठा पोलिस बंदोबस्त तैनात असून परिस्थिती नियंत्रणात असल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे.

    #bjp Chhatrapati Sambhajinagar Clashes goats Shiv Sena Shinde Group sillod Stone pelting tension
    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Telegram Email
    Team Lokshahi Live
    • Website

    Related Posts

    शिक्षकाचे चौथीच्या ५ विद्यार्थिनींशी अश्लील चाळे

    March 10, 2026

    फरार फौजदारासह पुत्राला अटक

    March 10, 2026

    इराण-इस्त्रायल युद्धामुळे साखरेचा गोडवा हरवला

    March 10, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Lokshahi Live. Designed by ContentOcean Infotech.
    • Contact Us
    • About us

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.