Close Menu
लोकशाही लोकशाही
    Facebook X (Twitter) Instagram
    Trending
    • ओझरखेडा तलावामध्ये हतनूर धरणाचे पाणी!
    • TET पेपरफुटी : सोलापुरातून प्रशिक्षण केंद्र चालकाला अटक
    • मंत्रिमंडळ बैठकीत ७ महत्त्वाचे निर्णय
    • वेल्हाळे कपिलेश्वर महादेव मंदिरात १७ ऑगस्टला मुकुट सोहळा
    • राजस्थानमधील व्यापाऱ्याकडून सात लाखांची फसवणूक
    • पुन्हा मुख्यमंत्र्यांच्या हेलिकॉप्टरमध्ये तांत्रिक बिघाड
    • खिडकीतून मण्यार आता घुसला अन् होत्याचे नव्हते!
    • भर पावसातली महाबळेश्वर पिकनिक थेट जीवावर बेतली
    Facebook X (Twitter) Instagram
    लोकशाही लोकशाही
    Demo
    • होम
    • राष्ट्रीय
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
    • जळगाव
      • जळगाव जिल्हा
    • राजकारण
    • गुन्हे वार्ता
      • अपघात
    • संपादकीय
      • लोकशाही विशेष
    • व्हिडीओ
    • ई-पेपर
    • आणखी
      • हवामान
      • कृषी
      • नोकरी संदर्भ
      • आरोग्य
      • शैक्षणिक
      • खाद्य संस्कृती
      • राशी भविष्य
      • अध्यात्म
      • लोकार्थ
      • पॉडकास्ट
    लोकशाही लोकशाही
    Home»अपघात»किल्ल्यावरून दरीत पडलेलेया केतन अग्रवाल प्रकरणात ट्विस्ट
    अपघात

    किल्ल्यावरून दरीत पडलेलेया केतन अग्रवाल प्रकरणात ट्विस्ट

    सुरुवातीला अपघाती मृत्यू म्हणून समोर आली धक्कादायक माहिती
    Team Lokshahi LiveBy Team Lokshahi LiveJune 23, 2026No Comments1,339 Views
    Facebook Twitter Pinterest LinkedIn WhatsApp Reddit Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

     

    लोकशाही न्यूज नेटवर्क

    पुण्याच्या लोहगडावरून फोटो काढताना केतन अग्रवाल या बड्या बिझनेसमनच्या तरुण मुलाचा दरीत कोसळून मृत्यू झाला होता. या घटनेत आता नाट्यमय वळण आले आहे. होणाऱ्या नात्याला काळिमा फासणाऱ्या या घटनेने तपास अधिकारी सुद्धा चक्रावले आहेत. कोणी इतकं कसं क्रूर असू शकतं असा सवाल या घटनेनंतर विचारला जात आहे. या विचलीत करणाऱ्या घटनांमुळे समाजमन हादरले आहेत. जवळच्याच व्यक्तीने केतनचा काटा काढल्याचे तपासात समोर आले आहे. काय आहे ही घटना?

    भावी पत्नीसोबत सुखी आयुष्याची स्वप्न त्यानं रंगवली होती. तिच्यासोबत पुढील आयुष्याचं प्लॅनिंग त्यानं आखलं होते. गुरुवारी केतन अग्रवाल याच्या होणाऱ्या पत्नीचा वाढदिवस होता. त्या निमित्ताने केतन आणि होणारी पत्नी लोहगडावर ट्रेकिंगला गेले होते. त्यावेळी फोटोची पोज देताना तो घसरुन पडला, असं समोर आलं होतं. मात्र लोणावळा ग्रामीण पोलिसांच्या तपासात हा बनाव असल्याचं उघड झाला आहे. होणाऱ्या पत्नीच्या प्रियकराने केतनला दरीत ढकलून दिल्याचं समोर आलंय.या घटनेत होणाऱ्या पत्नीचा समावेश आहे का? यासंबंधीची चौकशी सुरु झाली आहे. सोबतचं प्रियकराला कोणी-कोणी साथ दिली का? याची चौकशी सुरु झाली आहे.

    केतन अग्रवाल हा पिंपरी चिंचवडमधील नामांकित बांधकाम व्यावसायिक विशाल अग्रवाल यांचा मुलगा होता. तो नोव्हेंबर महिन्यात विवाहबंधनात अडकणार होता. राजस्थानमधील उदयपूर येथे शाही विवाह सोहळा होणार होता. त्यासाठी पाण्यासारखा पैसा खर्च करण्यात येणार होता. लग्नासाठी पॅलेस आणि विमान बुक करण्यात आले होते. या लग्नाची जय्यत तयारी सुरू होती. दोन्ही कुटुंब आनंदात होती. पण या घटनेने दोन्ही कुटुंबांना मोठा धक्का बसला.

    गुरूवारी भावी पत्नीसोबत केतन लोहगड येथे ट्रेकिंगसाठी गेला होता. ट्रेकिंग आणि फोटोशूट सुरू असताना केतन दरीत कोसळल्याची माहिती पत्नीने दिली. बचाव पथकाने तीन तासांचे रेस्क्यू ऑपरेशन राबवून मृतदेह बाहेर काढला. या घटनेनंतर पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवली. मोबाईल डेटा, कॉल रेकॉर्ड, घटनास्थळावरील काही व्यक्तींची चौकशी केल्यानंतर पोलिसांच्या मनात पाल चुकचुकली. त्यांना या घटनेवर संशय आला. त्यानंतर त्यांनी पत्नीला आणि तिच्या प्रियकराला ताब्यात घेतले.

    पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सिया गोयल हिला केतन अग्रवाल याच्याशी लग्न करायचे नव्हते. हे लग्न तिला मान्य नव्हते. त्यामुळे तिने केतनलाच दूर करण्याचा डाव आखला. त्यासाठी तिने तिच्या एका मित्राची मदत घेतली. मग केतनला वाढदिवसाच्या निमित्ताने लोहगड ट्रेकिंगसाठी लोहगड येथे नेण्यात आले. तिथे संधी मिळताच, मित्रांच्या मदतीने केतनला थेट खोल दरीत ढकलून देण्यात आले. दरीत खाली कोसळून केतनचा जागीच मृत्यू झाला.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Telegram Email
    Team Lokshahi Live
    • Website

    Related Posts

    TET पेपरफुटी : सोलापुरातून प्रशिक्षण केंद्र चालकाला अटक

    August 11, 2026

    मंत्रिमंडळ बैठकीत ७ महत्त्वाचे निर्णय

    August 11, 2026

    वेल्हाळे कपिलेश्वर महादेव मंदिरात १७ ऑगस्टला मुकुट सोहळा

    August 11, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Lokshahi Live. Designed by ContentOcean Infotech.
    • Contact Us
    • About us

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

    whatsapp-Gif