Close Menu
लोकशाही लोकशाही
    Facebook X (Twitter) Instagram
    Trending
    • दिल्लीतील इमारत कोसळली; किती विद्यार्थी दबले गेले?
    • यावल–रावेर बसमधून सोन्याच्या दोन वाट्या चोरीला
    • यावल तालुक्यात अवैध धंद्यांचा महापूर; प्रशासन गप्प का?
    • भुसावळ राष्ट्रवादीचे ११ नगरसेवक शिवसेनेत; सावकारे गटात अस्वस्थता!
    • बापरे! मुख्य वीज उपकेंद्रात भीषण स्फोटाने खळबळ!
    • दिल्लीत 5 मजली इमारत कोसळली
    • महाराष्ट्रातील ‘या’ भागांमध्ये पावसाचा इशारा
    • नव्या टीमनंतर केंद्रीय मंत्रिमंडळ विस्ताराच्या चर्चांना वेग
    Facebook X (Twitter) Instagram
    लोकशाही लोकशाही
    Demo
    • होम
    • राष्ट्रीय
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
    • जळगाव
      • जळगाव जिल्हा
    • राजकारण
    • गुन्हे वार्ता
      • अपघात
    • संपादकीय
      • लोकशाही विशेष
    • व्हिडीओ
    • ई-पेपर
    • आणखी
      • हवामान
      • कृषी
      • नोकरी संदर्भ
      • आरोग्य
      • शैक्षणिक
      • खाद्य संस्कृती
      • राशी भविष्य
      • अध्यात्म
      • लोकार्थ
      • पॉडकास्ट
    लोकशाही लोकशाही
    Home»राष्ट्रीय»भाजपमध्ये या नाहीतर गोळ्या घालू अशी धमकी
    राष्ट्रीय

    भाजपमध्ये या नाहीतर गोळ्या घालू अशी धमकी

    अभिजीत दीपके यांचा भाजपवर गंभीर आरोप
    Team Lokshahi LiveBy Team Lokshahi LiveJuly 30, 2026No Comments252 Views
    Facebook Twitter Pinterest LinkedIn WhatsApp Reddit Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

     

    लोकशाही न्यूज नेटवर्क

    कॉक्रोच जनता पार्टीचे संस्थापक अभिजित दीपके यांनी संभाजीनगरमध्ये माध्यमांशी संवाद साधताना पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्र सरकारच्या कार्यपद्धतीवर जोरदार टीका केली. ‘मोदींना संविधानापेक्षा मोठं केल्याने देशाची वाट लागली’, असा आरोप अभिजीत दिपके यांनी केला आहे. त्यांनी सत्तेच्या केंद्रीकरणावर आणि संविधानाच्या भूमिकेवर प्रश्न उपस्थित केले आहेत. तू भाजपात ये नाही तर तुला गोळ्या घालू, अशा धमक्या मला आल्या होत्या असा दावा अभिजीत दीपके यांनी केला आहे.

    अभिजीत दीपके यांनी भाजपकडून ऑफर आल्याचे सांगितले. ते म्हणाले की, ‘या देशातील जनतेला एकत्र येणं गरजेचं आहे. मला भाजपकडून खूप ऑफर आल्या. कितीही ऑफर आल्या तरी मी भाजपमध्ये जाणार नाही. मला भाजपमध्ये जायचं असतं तर मी आधीच गेलो असतो. धमक्या आल्या होत्या की भाजपमध्ये सहभागी व्हा, आंदोलन मागे घ्या नाही तर आम्ही तुम्हाला गोळ्या घालू. ही भाजपची आणि संघाची प्रेमाची भाषा आहे. तू ये नाही तर तुझं काही तरी करून टाकू. आई-बाबांना देखील धमक्या दिल्या जात आहे. तुझ्या घरी जाऊन आई-बाबांना पाहून घेऊ अशा अनेक धमक्या आल्या आहेत.’

    अभिजीत दीपके यांनी पीएम मोदी आणि अमित शहा यांच्यावर घणाघात केला. ते म्हणाले की, ‘तुम्ही माझं काय करणार आहात. तुम्ही एका ३० वर्षांच्या मुलाला भीती दाखवता. नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांच्या नातवाच्या वयाचा मी आहे. तुम्ही तुमच्या नातवाच्या वयाच्या मुलांना अशा धमक्या देतात. लाज वाटली पाहिजे तुम्हाला की काय करताय तुम्ही?’

    झेनझीचा चेहरा पुढील काळात राजकारणात जाईल का? यावर अभिजीत दीपके यांनी सांगितले की, ‘खूप पुढचे बोलत आहोत आपण. एका माणसाला मोठं करू नका. आपल्या देशाची जी काही वाट लागली आहे ती यामुळे लागली आहे. २०१४ मध्ये जो माणूस आला त्याला आपण आपल्या संविधानापेक्षा आणि देशापेक्षा मोठं केलं. आपण त्याला देवापेक्षा मोठं करून टाकलं. त्यामुळे आपल्या देशात बेरोजगारीवर बोलणं होत नाही. आपल्या शिक्षण व्यवस्था, सरकारी रुग्णालयांच्या अवस्थेबद्दल बोलणं होत नाही. कारण आपण सगळ्यांनी एका माणसाला आपल्या देशापेक्षा आणि संविधानापेक्षा मोठं करून टाकलं. सकाळ ते संध्याकाळपर्यंत सर्व मीडियावाले मोदीचा जप करत आहेत. त्यांनी बेरोजगारीवर बोललं पाहिजे. ‘

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Telegram Email
    Team Lokshahi Live
    • Website

    Related Posts

    दिल्लीत 5 मजली इमारत कोसळली

    September 6, 2026

    नव्या टीमनंतर केंद्रीय मंत्रिमंडळ विस्ताराच्या चर्चांना वेग

    September 6, 2026

    भयंकर! विषारी दारूमुळे ९ जणांचा दुर्दैवी मृत्यू

    September 6, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Lokshahi Live. Designed by ContentOcean Infotech.
    • Contact Us
    • About us

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

    whatsapp-Gif