Close Menu
लोकशाही लोकशाही
    Facebook X (Twitter) Instagram
    Trending
    • महामार्ग बायपासचा अट्टाहास अखेर नडला!
    • प्रवास ग्रंथालयांचा : माहिती संग्रहालय ते आधुनिक ग्रंथालय!
    • ‘डॉल्फिन’ आणि ‘चान-होम’ चक्रीवादळांमुळे भारताला धोका
    • अशी तशी नव्हे; चक्क बसचीच केली चोरी!
    • बापरे! भटक्या श्वानाचा कहर; १३० जणांना चावला!
    • ए.आर. रहमानच्या मुलाचा मध्यरात्री भीषण अपघात
    • फुटलेल्या सहा खासदारांमध्ये चलबिचल वाढली
    • संघर्ष पेटला : झारखंडमध्ये जंतरमंतरसारखी पुनरावृत्ती
    Facebook X (Twitter) Instagram
    लोकशाही लोकशाही
    Demo
    • होम
    • राष्ट्रीय
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
    • जळगाव
      • जळगाव जिल्हा
    • राजकारण
    • गुन्हे वार्ता
      • अपघात
    • संपादकीय
      • लोकशाही विशेष
    • व्हिडीओ
    • ई-पेपर
    • आणखी
      • हवामान
      • कृषी
      • नोकरी संदर्भ
      • आरोग्य
      • शैक्षणिक
      • खाद्य संस्कृती
      • राशी भविष्य
      • अध्यात्म
      • लोकार्थ
      • पॉडकास्ट
    लोकशाही लोकशाही
    Home»राष्ट्रीय»बापरे! 9 ते 18 ऑगस्ट दरम्यान मुंबईवर दहशतवादी हल्ला?
    राष्ट्रीय

    बापरे! 9 ते 18 ऑगस्ट दरम्यान मुंबईवर दहशतवादी हल्ला?

    सोशल मीडियावर मुंबईबाबत दावा करणारी धक्कादायक पोस्ट
    Team Lokshahi LiveBy Team Lokshahi LiveAugust 5, 2026Updated:August 5, 2026No Comments395 Views
    Facebook Twitter Pinterest LinkedIn WhatsApp Reddit Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

     

    लोकशाही न्यूज नेटवर्क

    मुंबईवर दहशतवादी हल्ला होणार असल्याची सोशल मिडियावर पोस्ट शेअर करण्यात आली. त्यानंतर मुंबई पोलिसांकडून घटनेची गंभीर दखल घेतलीये. सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X वर @AstroPrashnath9 या हँडलवरून ऑगस्ट 2026 दरम्यान भारतासाठी धोक्याचा इशारा देणारी पोस्ट करण्यात आली. ही पोस्ट शेअर करण्यात आल्याने खळबळ उडाली.

    या पोस्टमध्ये 9 ते 18 ऑगस्ट हा अतिशय धोकादायक कालावधी असून पाकिस्तानी दहशतवाद्यांकडून मोठ्या हल्ल्यांची शक्यता व्यक्त करण्यात आली. ही पोस्ट इंग्रजीत असून यात “India shall be careful in the month of August 2026…9th to 18th August very dangerous time period…Big terrorist attacks possible by Pakistani. Terrorists. असे म्हटले आहे. अनेकांनी ही पोस्ट रिशेअर देखील केली.

    ही पोस्ट @tstark86v1 या हँडलद्वारे टॅग करून पोलिसांच्या निदर्शनास आणून देण्यात आली. पोलिसांकडून या पोस्टची दखल घेण्यात आली असून पुढील तपास सुरू आहे. गेल्या काही दिवसांपासून धमकीचे मेसेज आणि फोन सतत मुंबई पोलिसांना येत आहेत. काही दिवसांपूर्वीच मुंबईतील ताज हॉटेल उडवून देणार असल्याची धमकी देण्यात आली होती.

    हेच नाही तर भारतीय विमान कंपन्यांनाही विमानात बॉम्ब हल्ल्याचा फोन किंवा मेल येण्याच्याही घटना सतत घडत होते. ज्याचा फटका विमान कंपन्यांना सहन करावा लागला. त्यामध्येच आता सोशल मीडियावर अशाप्रकारची पोस्ट शेअर करण्यात आली. पोस्ट शेअर करणाऱ्या व्यक्तीकडे याबाबत काही माहिती आहे का? याचा तपास हा केला जात आहे.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Telegram Email
    Team Lokshahi Live
    • Website

    Related Posts

    ‘डॉल्फिन’ आणि ‘चान-होम’ चक्रीवादळांमुळे भारताला धोका

    August 10, 2026

    अशी तशी नव्हे; चक्क बसचीच केली चोरी!

    August 10, 2026

    बापरे! भटक्या श्वानाचा कहर; १३० जणांना चावला!

    August 10, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Lokshahi Live. Designed by ContentOcean Infotech.
    • Contact Us
    • About us

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

    whatsapp-Gif